सावधान : राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदी पूल ओलांडताना घ्या खबरदारी : हवेच्या झोक्याने लहरून दुचाकी गेली पुलावरून सरळ नदीत : नाविकांच्या तत्परतेने वाचले दोन जीव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सावधान : राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदी पूल ओलांडताना घ्या खबरदारी : हवेच्या झोक्याने लहरून दुचाकी गेली पुलावरून सरळ नदीत : नाविकांच्या तत्परतेने वाचले दोन जीव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शोएब शेख -राजुरा -

राजुरा बल्लारपूर नदीवरील पुलाच्या कठड्याची लेव्हल व रोड ची लेव्हल एकच झाली आहे त्यात नेमके पावसाळयाच्या दिवसात पुराचे कोणतेही लक्षण दिसत नसताना बांधकाम विभाग रिवाजाप्रमाणे पुलावरील ब्यारिकेट्स पावसाळा सुरु होताच काढुन टाकतात.

पावसाळ्याच्या दिवसात पुलावर जोरात हवा वाहते त्यामुळे कमी वजनाच्या गाड्या हवेच्या झोकाने लहरात त्यामुळे अश्या अपघाताची शक्यता असते अशीच एक घटना आज दुपारी 4वाजता या पुलावर घडली. 

बल्लारपूर येथून राजुरा कडे येणाऱ्या एका दाम्पत्याने  याचा भयानक थरार अनुभवाला सुदैवाने त्यांची दुचाकी खाली पडताच नदीवर असलेल्या नाविकांनी तात्काळ मदतीला धावत दोघांचे जीव वाचविले तर दुचाकी अजूनही पाण्यातच आहे.  ने ह्यापुर्वीही अनेकदा दुचाकिच नव्हे तर चार चाकी वाहनेही नदित पडल्याची अनेक उदाहरने आहेत पण ह्यावर उपाययोजना करण्याएवजी बांधकाम विभाग व प्रशासन पावसाळा सुरु होताच कठ्डे काढुन मोकळे होते आहे.