साहित्य सम्राट " अण्णा भाऊ साठे "यांची ९९ वी जयंती सोहळा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

साहित्य सम्राट " अण्णा भाऊ साठे "यांची ९९ वी जयंती सोहळा संपन्न

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर -संतोष इंद्राळे जिवती :                          
या देशातील दलित,उपेक्षित,वंचित,समाज बांधवांचे दुःख,वेदना,व आक्रोश आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर मांडणारे जागतिक कीर्तीचे साहित्यिक साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिवती येथे मोठ्या उत्साहाने घेण्यात आला.

आज२८/०८ २०१९ ला  ठीक सकाळी ९.३० ला गावातील प्रतिष्ठित लोकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर ठीक १०.३० ला विदर्भाचा बुलंद आवाज शाहीर मा.संभाजी ढगे आणि संच यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला व दुपारी ठीक १२ वाजता मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.


या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.प्रा.डॉ.प्रकाश आर बोरकर,एस.पी.कॉलेज चंद्रपूर,मा.नामदेवराव कांबळे अध्यक्ष,डी.डी.सी.आदीलाबाद व मुख्यमार्गदर्शक म्हणून मा.आर जोगदंड प्रखर वक्ता बीड,प्रमुख पाहुणे मा.जी एस कांबळे, मा.आर एस नेमाने, मा.डी एम तपासकर मा.डॉ.प्रशांतकुमार सुर्यवंशी, मा.प्रभाकर शिंदे,मा.हरिभाऊ मोरे, तर विशेष अतिथी मा.प्रा.किरणकुमार मोरे,मा.नरशिंग मोरे,मा.नभिलास भगत,मा.डॉ.भूषण मोरे,मा.सौ.पुष्पाताई नैताम,मा.अशपाक शेख,मा.अमर राठोड, मा.विशाखा शेळकी,मा.सौ.अनिताताई गोतावळे,मा.अंकुश काकडे, आलेल्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते काही सत्कारमूर्तीचा सत्कार करण्यात आला यात मध्ये मा.श्यामसुंदर सुर्यवंशी,मा.नामदेव डकरे,मा.आकाश गायकवाड,मा.इंद्रकुमार गायकवाड,मा.गुरुदेव सूर्यवंशी यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.


ठीक ३.०० वाजता मा.संजय धोटे,मा.रामभाऊ गुंडीले, मा.महेश देवकते, मा.इंदिराताई काकडे या सर्व पाहुण्यांच्या शुभहस्ते साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. व सर्व पाहुण्यांनी जमलेल्या नागरिकांना अण्णा भाऊच्या साहित्या वर मार्गदर्शन केले,या कार्यक्रमाचे आयोजन युवा मुक्ता फाउंडेशन व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती जिवती याच्या तर्फे करण्यात आले होते.