त्या वाघीनीच्या मृत्यू बाबत गावकऱ्यांवरील कारवाहीने पोडसागाव एकवटला : धाबा वनपरींक्षेत्र कार्यालयाला धडक . - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

त्या वाघीनीच्या मृत्यू बाबत गावकऱ्यांवरील कारवाहीने पोडसागाव एकवटला : धाबा वनपरींक्षेत्र कार्यालयाला धडक .

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : गोंडपिपरी -
गोंडपिपरी तालूक्यातील जूना पोडसा येथिल शेतात मृतावस्थेत आढळून आलेली वाघीन विषबाधेची बळी ठरल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविलेला आहे. 


वनविभागाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी सूरु केली आहे.यात वाघाडे नामक शेतकऱ्यांच्या  शेतात वाघ आढळुन आल्याने वनविभागाने  त्या निस्पाप  दोन शेतकऱ्यांना वारवार चौकशी साठी बोलावन्याचा प्रकार वनविभागाने सुरु केला आहे.त्यामुळे अखेर संतापलेल्या पोडश्यातिल शेतकऱ्यांनी एकञ येत वनपरीक्षेञ अधिकार्याच्या कार्यालयाला घेराव घातला.व कार्यवाही न करन्याबात मागणी  केली.

मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या जूना पोडसा येथिल रसीका वाघाडे. नामक शेतकऱ्याचा शेतात पट्टेदार वाघ मृताअवस्थेत आढळून आला. वनविभागाचा वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता घटनास्थळावर काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. त्यामुळे वाघीनीवर विषप्रयोग झाला असावा असा अंदाज वनविभागाने काढला आहे.माञ २७ आंगष्टला वनविभाची टिम राञी उशिरापर्यत तिन शेतकर्यांचे बयान घेतले. आणि दोन दिवसापासून चौकशीसाठि वारंवार बोलाविल्याने त्या शेतकऱ्यांना  नाहक त्रास सहन करावा लागत होता.

या तिनही शेतकऱ्यांचा वाघाच्या  म्यूत्युस कुठलेही कारन नसताना हे वनविभागाचे अडेलतट्टू धोरन आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करन्याचा कटकारस्थान सुरु आहे. हा आन्याय आम्ही शेतकरी  खपऊन घेनार नसुन आम्हा संपूर्ण  गावावरच गुन्हे दाखल करा अशी मागणी करित शेकडो गावकर्यांनी धाबा येथिल वन कार्यालयाला धडक दिली. मोर्चा येतांना बघून वनविभागाने मुख्य गेट बंद केला त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान आमदार संजय धोटे यानी कार्यालय गाठून वनपरिक्षेत्राधिकारी डि.एम.राऊतकर यांच्याशी चर्चा केली. निर्दोषावर कार्यवाही होणार नाही ,चौकशीत सहकार्य करा असे आव्हान आमदार धोटे यांनी केले. पोडसा ग्रामपंचायतेचा सरपंचा संगिता रायपुरे,उपसरपंच देविदास सातपुते,बाबुराव बोमकंटीवार,महेंद्र येलमुले,सूरेश येलमुले,निर्मला येलमुले यांनी वनपरिक्षेत्राधिकार्यांकडे निवेदन  दिले.