उमा नदीत ट्रक्टर कोसळले ; चालकाचा बुडून मृत्यू : मूल - बोरचांदली पुलावरील घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उमा नदीत ट्रक्टर कोसळले ; चालकाचा बुडून मृत्यू : मूल - बोरचांदली पुलावरील घटना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :मूल प्रतिनिधी  :- 

शेतात  चिखलणी करुन नादुरुस्त झालेली ट्रक्टर  दुरुस्ती साठी मूल मध्ये नेत असताना बोरचांदली मार्गावरील पुलावरून कठडे नसलेल्या  उमा  नदीत कोसळले  . यात चालकाचा बुडून  मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. 


शोध पथकाच्या अविरत प्रयत्ना नंतर बुडून मृत्यु झालेल्या चालकास गुरुवारला नदीतून बाहेर काढण्यास यश मिळाले . ट्रक्टर चालकाचे नाव रत्नाकर शिंदे , वय ३६ , वर्षे असे असून तो  राजगड येथिल रहिवासी अाहे . पोळ्याच्या जवळ जवळ ही घटना घडल्याने राजगड मध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.


       
घटना माहित होताच पोलिस प्रशासन अाणि गावक-यांनी नदी कडे धाव घेतली होती . रात्र झाल्याने बुडालेल्या  चालकाचा शोध घेता अाला नाही . नदीत पाणी भरपूर असल्याने चालकाचा  शोध लागला नव्हता . मात्र गुरुवारला  पोलिस प्रशासन व तहसील प्रशासन  तर्फे रेस्कू टीम द्वारा शोध मोहिम राबविण्यात आली. बोटी द्वारा बेपत्ता चालकाचा शोध घेण्यात आला. क्रेन द्वारा पाण्यातून ट्रक्टर काढण्यात आले  ट्रक्टरच्या इंजिन मध्येच त्याचा मृतदेह सापडला . 

      
राजगड येथे धान पिकाच्या रोवणीसाठी शेतात ट्रक्टरद्वारे  चिखलणी करण्यात अाली.  त्यानंतर  नादुरुस्त झाल्याने ट्रक्टरला मूल मध्ये दुरुस्तीला नेत होता. उमा नदीच्या पुला जवळ वाहन अनियंत्रित झाल्याने त्याचा ट्रक्टर वरील ताबा सुटला अाणि   चालक रत्नाकर शिंदे ट्रक्टरसहीत उमा नदीत कोसळला. त्यातच चालकाचा  बुडून मृत्यू झाला. सदर ट्रक्टर राजगड येथिल विजय  नार्ले यांच्या मालकीची होती . 


         
या घटनेने राजगड येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी तहसीलदार डी जी जाधव, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, नायब तहसीलदार साधनकर , तलाठी ,    उपस्थित होते. यावेळी बघ्याची गर्दी मोठी  होती .

18 Ways to Earn Money Online from Home Without Investment