झुमकार द्वारे पुन्हा दारू तस्करी : पोलिसांनी पाठलाग करताच आरोपी गाडी सोडून फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

झुमकार द्वारे पुन्हा दारू तस्करी : पोलिसांनी पाठलाग करताच आरोपी गाडी सोडून फरार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -

झूमकार नावाच्या मोबाईल अँप द्वारे ऑनलाईन पद्धतीने कार  बुक करून अवैधरीत्या दारूची तस्करी करीत असलेल्या “ झूमकार” कंपनीच्या दोन कार वरोरा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन आरोपींना रंगेहाथ अटक केली होती. ही कारवाई पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा झूमकार या  मोबाईल अँप वरून  ऑनलाई बुक केलेली  कार पोलिसांनी सिनेस्टाईल  पाठलाग करून ताब्यात घेतली आहे.आरोपी मात्र कार सोडून फरार झाला आहे.

"झूमकार" या मोबाईल अँपद्वारे ऑनलाईन  पद्धतीने कार बुक करून अवैधरीत्या दारूची तस्करी करीत असल्याची  माहिती वरोरा पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे मंगळवारी  पोलिसांनी दोन झूमकार  ताब्यात घेऊन आरोपींना रंगेहाथ अटक केली होती हे विषेश. दारूसाठ्यासह २० लाखाचा मुद्देमाल  जप्त केला होता .या बाबत झूमकार या  ऑनलाईन कार बुकिंग कंपनीचे व्यवस्थापक वरोरा पोलीस स्टेशन ला आले होते. त्यानंतर त्यांनी 'झूमकार या मोबाईल अप्प वरून बुक झालेली  एम.एच.४३ बी.पी. ही कार काही दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सांगतिले होते.

यानंतर  पोलिसांनी तिचा जी.पी.एस. लोकेशन च्या आधारे शोध घेतला असता ही कार वणी मार्गे वरोरा कडे येत असल्याचे समजताच सापळा रचून गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता चालक हा गाडी सोडून पसार झाला होता.यानंतर गाडीची झडती घेतली असता यामध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला पोलीस आरोपीचा शोध घेत असून ही कारवाही पोलीस उपविभागीय अधिकारी पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील , पोलीस उपनिरीक्षक संदीप मिश्रा व आदींनी केली.
Earn money online without investment
Web hosting,shared web hosting