चंद्रपूर शहरातील दारूबंदी उठविण्यासाठी शिवसेना करणार एल्गार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर शहरातील दारूबंदी उठविण्यासाठी शिवसेना करणार एल्गार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर संपूर्ण जिल्हा हा दारूमुक्त जिल्हा म्हणून ओळखल्या जात होता, तसेच जिल्ह्याच्या विकास व आरोग्याकरिता हा अतिशय चांगला निर्णय असल्याचे जनतेने पालकमंत्र्यांचे कौतुकही केले. 

सुरुवातीच्या काही महिन्यात दारू तस्करांवर योग्य ती कारवाही करुन ही दारूबंदी यशस्वी सुद्धा झाली होती.परंतु त्यानंतर दारुतस्करांनी हळूहळू शहरात आपले जाळे विणून अवैध दारूविक्रीचा गोरखधंदा सुरु केला. 
             
दारूबंदीच्या सुव्यवस्थेकरिता निवेदन देताना मनोज पाल, महानगर प्रमुख, व महिला आघाडी


याच दारूविक्रीमुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी चिडे यांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला.दारूबंदीच्या अयशस्वितेचे खरे जबाबदार हे पोलीस प्रशासनच व मुख्यतः अकबारी विभाग आहे असा स्पष्ट आरोप शिवसेना महानगर प्रमुख मनोज पाल यांनी केला असून येत्या 15 दिवसात अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या जर आवळण्यात आल्या नाही तर शिवसेना शहर चंद्रपूर च्या वतीने एकदिवसीय तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांना दिला आहे.