विनाअनुदानित शिक्षकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विनाअनुदानित शिक्षकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -

विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी जिवती तालुक्यातील विना अनुदानित शिक्षक यांनी जिवती तहसील कार्यालयासमोर आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
     
गेल्या 17 ते 18 वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माद्यमिक व उच्च माद्यमिक शाळांतील शिक्षक काम करत आहेत परंतु त्यांना शासनाकडून अजूनही अनुदान मिळत नसल्यामुळे गेल्या महिनाभरापासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन,उपोषण सुरू आहे.

यातच काल मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन कर्त्या शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला यात काही शिक्षक गंभीर जखमी झालेत याचाच एक निषेध म्हणून जिवती तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात सर्व विना अनुदानित प्राथमिक, माद्यमिक व उच माद्यमिक तसेच अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे, शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे या मागण्या मांडण्यात आल्या होत्या.
   
या आंदोलनात कायम विना अनुदानित संघटनेचे अध्यक्ष जी.आर.आडे,  उपाध्यक्ष संघरक्षित तावाडे सचिव आर.बी.फड,सहसचिव एस. के.मुंडे,संघटक पी.पी.पवार,कार्यवाहक एल. डी. मंगाम, सलागार एस. एल. गेडाम,सतीश राठोड,बी. बी.वेट्टी, राजू जाधव, पट्टेवाले,विठ्ठल कांबळे, गुणवंत मस्कले,व्ही.व्ही.कोटम्बे, नंदेश्वर खोब्रागडे, बालाजी चव्हाण तसेच अनेक शिक्षक उपस्थित होते.