विना अनुदानित शिक्षकांचा अनुदानासाठी एल्गार व आज शाळा बंद आंदोलन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विना अनुदानित शिक्षकांचा अनुदानासाठी एल्गार व आज शाळा बंद आंदोलन

Share This
खबरकट्टा /संतोष इंद्राळे - जिवती : 


गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक,कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत,शिक्षण दानाचे पवित्र कार्य पार पाडत आहेत. शासन स्तरावर विविध संघटनानी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्याची जाणीव करून दिली,तरी ही प्रशासनाने दूर्लक्ष केले,विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न सुटावा यासाठी विना अनुदानित शाळा तालुका कृती समिती जिवती तर्फे आज 26/08/2019 ला एकदिवसीय लाक्षणिक शैक्षणिक शाळा बंद आंदोलन पुकारले.

शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी पोहचव्या यासाठी तसे निवेदन सुद्धा जिवती प.स.तिचे संवर्ग विकास अधिकारी यांना देण्यात आले,यावेळी तालुका कृती समितीचे अध्यक्ष मा.गजानन आडे  ,मा.संघरक्षित तावडे उपाध्यक्ष, मा.रामदास फड सचिव,प्रा.लक्ष्मण मंगाम,प्रा.संजय मुंडे,प्रा.माने सर,प्रा.राजेश जाधव, राठोड ,दिंडे सर,वारे, इंद्राळे, गेडाम, पट्टेवाले ,पवार,आडे,वेट्टी ,बालाजी चव्हाण व शिक्षकेत्तर कर्मचारी व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच झालेल्या बैठकीत उद्या विना अनुदानित  शाळा कृती समिती तर्फे तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचे आज ठरले आहे,त्याचे रितसर निवेदन सुद्धा नायब तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यासंदर्भात शासनाकडून अनेकदा आश्वासन देण्यात आली परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाने केली नाही,लवकरच विधान सभेची आचारसंहिता लागण्या पूर्वी शासनाने शाळांना अनुदान घोषित करून विनावेतन शिक्षकांना न्याय मिळवून द्यायला हवे असे शिक्षकांचे म्हणने आहे.