"युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू काही " : पंचायत समिती जिवतीच्या युवक कल्याण उपक्रमाअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू काही " : पंचायत समिती जिवतीच्या युवक कल्याण उपक्रमाअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : संतोष इंद्राळे - जिवती 

युवक कल्याण उपक्रमांतर्गत,पंचायत समिती जिवती च्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा "युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू काही" दिनांक 20/08/2019 ला गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे घेण्यात आली.


सदर स्पर्धेला उदघाटक म्हणून मा.श्री.मालवी सर विस्तार,अधिकारी,पं.स.जिवती, अध्यक्ष म्हणून प्रा.पांडुरंग सावंत प्राचार्य,गोंडवाना कनिष्ठ महाविद्यालय,जिवती प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.अंकुश राठोड,.श्री.वंजारी सर, पिट्टिगुडा, श्री.गोरे सर नंदपा, उपस्थित होते.परीक्षक म्हणून  प्रा.राजेश जाधव, प्रा.वावरे सर, प्रा.धूर्वे सर यांनी कार्य केले.सर्व अतिथी महोदयांनी व परीक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.मयमुना रसुल शेख, विदर्भ महाविद्यालय जिवती, द्वितीय क्रमांक स्वप्निल राहुल चव्हाण,गोंडवाना महाविद्वयालय जिवती, तृतीय क्रमांक संयुक्तपणे कु.वैष्णवी अण्णाराव शेळके, विदर्भ महाविद्यालय जिवती व कु.सपना नागेश देवाले, गोंडवाना महाविद्यालय जिवती यांनी पटकाविले. मा.मालवी सर विस्तार अधिकारी जिवती,  मा.प्रा.पांडुरंग सावंत, प्राचार्य,गोंडवाना कनिष्ठ महाविद्यालय जिवती, श्री.अंकुश राठोड सर यांच्या मार्गदर्शनात सदर स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.