राजुरा काँग्रेस तर्फे माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांना श्रद्धांजली अर्पण. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा काँग्रेस तर्फे माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांना श्रद्धांजली अर्पण.

Share This
-प्रभाकरराव मामुलकर काँग्रेसचे जेष्ठ आणि निष्ठावंत लोकनेते. --  माजी आमदार सुभाष धोटे. 
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

आज दिनांक २८/०८/२०१९ रोजी ठिक १२.०० वाजता राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे कार्यालय, गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
              
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले प्रभाकरराव मामुलकर हे काँग्रेसचे जेष्ठ आणि निष्ठावंत लोकनेते होते, आयुष्य भर काँग्रेस पक्षाच्या भरभरासाठी, हितासाठी कार्य केले, सर्व पक्षातील नेते व सामान्य कार्यकर्ते त्यांचा आदर करीत होते. असे हे लाडके नेतृत्व आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी खंत व्यक्त केली. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी स्व. मामुलकरांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. 
              
या प्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल हमीद अब्दुल गणी पटेल, नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोजवार, सभापती सौ. कुंदा जेनेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव देशपांडे, अॅड. सदानंद लांडे, आ. शि. प्र. मं. राजुराचे सचिव अविनाश जाधव, संचालक जश्वींदर धोत्रा, साजीद बियाबनी, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अँड. अरूण धोटे, प्राचार्य संभाजी वारकड, उपप्राचार्य खैरानी, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, नगरसेविका सौ. गीता रोहने, सौ. दिपा करमणकर, सौ. संध्या चांदेकर, सौ. साधना भाके, माजी नगरसेवक सय्यद सकावत अली, प. स. सदस्य तुकाराम माणूसमारे, मंगेश गुरूनुले, सुधीर नलगे,  सेवादल काँग्रेस अध्यक्ष दिनकर कर्नेवार, शामराव कोटनाके, जंगु पाटील येडमे, माजी सरपंच राजाराम येल्ला, माजी सरपंच वसंत ताजणे, माजी ग्रंथपाल विजय वाटेकर, नरेश मुंदडा, कृ. उ. बा. समितीचे संचालक अविनाश जेनेकर, रा. वि. युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, चेतन जयपूरकर, अर्चना गरगेलवार, सौ. शिला टाले, राजु झाडे, दिपक वांढरे, सुरेश इसनकर, ब्रिजेशजी जंगीतवार, मनोहर उलमाले, राजकुमार ठाकूर, ग्यानीराम शेंडे, बालाजी कोडापे आदी मान्यवर  उपस्थित होते.
         
कार्यक्रमाचे  संचालन आभार प्रदर्शन डॉ. उमाकांत धोटे यांनी केले. 
               
या प्रसंगी श्रद्धांजली कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमेटी राजुरा, सेवादल काँग्रेस, शहर काँग्रेस, किसान सेल काँग्रेस , अल्पसंख्याक काँग्रेस, अनुसूचित जाती जमाती काँग्रेस, शहर महिला काँग्रेस, तालुका महिला काँग्रेस, एनएसयुआय चे पदाधिकारी व कार्यकर्ते, आ. शि. प्र. मं. राजुराचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.