राजुरा ठाणेदाराची ब्रँडेड दारू विक्रेत्यावर धडक कारवाही : सोमनाथपूर येथे मालासहित आरोपी अटकेत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा ठाणेदाराची ब्रँडेड दारू विक्रेत्यावर धडक कारवाही : सोमनाथपूर येथे मालासहित आरोपी अटकेत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
सोमनाथपुर येथे राजुरा पोलीस निरीक्षक पी. एम. मडामे यांनी धडक कारवाई करत हुंडाई एसेन्ट क्र.एम एच -30 एल 9876 या वाहनात मॅकडोवेल नंबर -1 या ब्रँडेड कंपनीच्या प्रत्येकी 2 लिटर च्या 22 बाटल्या व वाहनासह एकूण 377000 रु चा मुद्देमाल जप्त केला. 


आरोपी संतोष नामदेव आगलावे याला तात्काळ अटक केली तर एक आरोपी फरार झाला.

काही महिन्यांपासून राजुरा शहरातील सोमनाथपूर हे अवैध दारू विक्रीचे केंद्रस्थान झाले असून थेट घटनास्थळीच ठाणेदाराने प्रत्यक्षात जाऊन ही कारवाही केल्याने अनेक अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.  ही कारवाही पोलीस  उपनिरीक्षक राहूल जंजाळ पो.ह.खुशाल टेकाम,रविद्र नक्कनवार,पो.शी. सचीन पडवे नवले,सुरज चन्ने,संपत पुलीपाका,यांनी केली व पुढील तपास पोलीस करीत आहेत.