ब्रेकिंग न्यूज :काँग्रेस चे जेष्ठ व राजुरा विधानसभेचे माजी आमदार नेते प्रभाकरराव मामूलकर यांचे निधन : दिनांक 24 ऑगस्टला दु 3.00 वा.शिवाजी स्टेडियमवर अंत्यसंस्कार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज :काँग्रेस चे जेष्ठ व राजुरा विधानसभेचे माजी आमदार नेते प्रभाकरराव मामूलकर यांचे निधन : दिनांक 24 ऑगस्टला दु 3.00 वा.शिवाजी स्टेडियमवर अंत्यसंस्कार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आदर्श प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी आमदार ,लोकनेते प्रभाकरराव मामुलकर (वय ८२  वर्षे )यांचे आज दि. २३ ऑगस्टला सायं. ठीक साडे चार वाजता चंद्रपूर येथे डॉ वासलवार यांच्या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. 


मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. मात्र औषधोपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची आज प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये शोककळा पसरली.

1960 साली राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे अनेक पदे भूषवली.चिंचोली सारख्या छोट्याशा गावच्या ग्रामपंचायत मध्ये अविरोध सरपंच बनले .

1962  ते 1978 पर्यंत जिल्हा परिषद चंद्रपूर येथे जिल्हा परिषद सदस्य व सभापती पदाची यशस्वीपणे धुरा सांभाळली. पंधरा वर्षाचा कार्यकाळ त्यांच्या राजकीय जीवनातील सुवर्ण काळाने उमेदीचा काळ होता.

या कार्यकाळात जिवती  ,कोरपणा या सारख्या दुर्गम भागात विकासाचे नवे पर्व सुरू झाले. आदिवासी गोरगरीब जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या कार्यकाळात दुर्गम भागाचा कायापालट झाला .आराेग्य, रस्ते ,शिक्षण पाणी आधी समस्या प्रामुख्याने सोडविण्यावर भर दिला.

१९८० मध्ये राजूरा मतदारसंघातून  आमदार म्हणून निवडून आलेत .उपेक्षित व मागासलेल्या मतदारसंघात विकासाला चालना देण्याचे भगीरथ कार्य माजी आमदार मामुलकर यांनी केले .या क्षेत्राचे दहा वर्ष आमदार होते. याच कार्यकाळात विधानसभा क्षेत्राचा कायापालट झाला. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन प्रकल्प, रस्ते पिण्याच्या ,पाण्याची सुविधा आरोग्य सुविधा प्रशिक्षण यावर त्यावर भर दिल्यामुळे यावर विकासकामांना गती मिळाली .आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना ,युवकांना विकासाची दिशा दाखविली.   विशेष कृती कार्यक्रमाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 

नक्षलप्रभावित क्षेत्रातील युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले .आदिवासी युवकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ध्येय ठेवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मामुलकर यांनी केले. 

1981 मध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून राजुरा कोरपना जिवती गाेंडपिंपरी तालुक्यात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे एक खंबीर नेतृत्व होते. पर्यावरण रक्षणासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे काम मामुलकर यांनी केले आहे .त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित केले .शिवाय संस्थेचा वनश्री पुरस्कार गौरव देऊन सत्कारही केला. अनेक अनाथ मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाचा मार्ग दाखविला. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुमनताई मामुलकर व बराच मोठा आप्तपरिवार आहे

टीम खबरकट्टा कडून त्यांना भावपुर्ण व विनम्र श्रद्धांजली🌷🌷🌷🌷