महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष पदी बंडू हजारें यांची नियुक्ती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष पदी बंडू हजारें यांची नियुक्ती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या संघटन वाढीच्या दृष्टीकोनातून राज्यभरात विस्तारीत होत असून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक उदयोगधंदे व शासकीय कंपन्यात कार्यरत असलेल्या शेकडो कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षकांचे प्रश्न हाताळण्याकरिता संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवी शिराळकर यांनी जिल्ह्यातील प्रश्नांची जान असणाऱ्या शिवसैनिकांचे पदाधिकारी मंडळ नियुक्त केले आहे.

यात आदेशानुसार  माजी नगरसेवक बंडूभाऊ हजारे यांची चंद्रपूर  जिल्हा कंत्राटीकामगार सेना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली असून , महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना र.न.5433चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची निवड दि.25 ऑगस्ट ला संघटनेचे अध्यक्ष रवी शिराळकर यांच्या आदेशानुसार नियुक्तीपत्र देऊन केली आहे. यावेळेस संघटनेचे कार्याध्यक्ष कृष्णा गायगोले,राज्य सचीव रामकृष्ण चिखलकर, राज्य सहसचिव लोकेश कोटरांगे उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी खालीलप्रमाणे-
जिल्हा अध्यक्ष- बंडू हजारे
जिल्हा कार्याध्यक्ष- सुनील चव्हाण
महिला जिल्हाध्यक्ष- डॉ भारती दुधानी
जिल्हा उपाध्यक्ष-संतोष नरुले
जिल्हा सचीव-प्रफुल सागोरे
जिल्हा सहसचिव-प्रमोद कोलारकर
जिल्हा संघटक-अब्दुल वसीम
जिल्हा सहसंघटक-रमेश ब्राम्हणकर
महिला संघटक-सौ.रोहिणी चौबे

सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा