वृक्षलागवड व शौचालय भ्रष्टाचाराचे भांडे फोडणाऱ्या माजी उपसरपंचा सहित पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी :सरपंच पतीवर गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वृक्षलागवड व शौचालय भ्रष्टाचाराचे भांडे फोडणाऱ्या माजी उपसरपंचा सहित पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी :सरपंच पतीवर गुन्हा दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर प्रतिनिधी -
कोरपना तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये गैर प्रकार घडत असल्याचा उलघडा ग्रामसभेत झाल्यानें  येथील ग्राम पंचायत दोन सदस्यांनी पिंपळगावाचे माजी उपसरपंच व दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी प्रकाश ईसनकर याना जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन गडचांदूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.


पिपळगाव येथील काही दिवसा आधी वृक्ष लागवडी कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीला देण्यात आलेले वृक्ष लागवड न करता फेकून देण्यात आले होते.तसेच  शौचालय बांधकामाच्या अनुदानात भ्रष्टाचाराचे प्रकरण आमसभेत उघडकीस आल्याने  उघडकीस करणाऱ्या प्रकाश इसनकर याना जीवे मारण्याची धमकी दिली.

यामध्ये ग्राम पंचायत सदस्यनी  आमची बदनामी केली या हेतूने पत्रकार प्रकाश ईसनकर यांच्या घरी जाऊन अरेरावी ने अश्लीन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

धमकी देणाऱ्या सदस्या पैकी ग्राम  पंचायतीच्या सरपंच  यांचे पती असून या ग्राम पंचायत सदस्यांवर भा.द. वी. कलम ,294,504,506,34 अंतर्गत  गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आले आहे. समोररील तपास पोलीस स्टेशन गडचांदूर येथील   ठाणेदार विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू आहे.
Web hosting is a service that allows organizations and individuals to post a website or web page onto the Internet. A web host, or web hosting service provider, is a business that provides the technologies and services needed for the website or webpage to be viewed in the Internet.