विदर्भ महाविद्यालय जिवती या महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ महाविद्यालय जिवती या महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर -संतोष इंद्राळे जिवती  

विदर्भ महाविद्यालय जिवती या महाविद्यालयात  मेजर ध्यानचंद यांच्या 114 व्या जयंतीचे औचित्य साधून समस्त देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा होतो आहे.

या अनुषंगाने आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय खेळ दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना भारतीय क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद यांचे सुवर्ण योगदान याविषयी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ एस एच शाक्य यांनी महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली या निमित्य होणाऱ्या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला .

या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक राऊत सर यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व प्राध्यापक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या या जीवनावर प्रकाश टाकण्याचे कार्य केले सोबत विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली मते प्रतिपादित केली