ब्रेकिंग न्युज : कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके यांच्यावर दारू विक्रेत्याचा प्राणघातक हमला . - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्युज : कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके यांच्यावर दारू विक्रेत्याचा प्राणघातक हमला .

Share This
-दोघे फरार तर एक अटकेत 
-कुऱ्हाडीने केला वार..पोलीस विभागात खळबळ 

खबरकट्टा / चंद्रपूर :  
राज्याचे वित्त नियोजन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी केली आणि महिला वर्गात आनंद पसरला. दारूबंदी असतांना काही भामटय़ांनी नियमाला डावलून अवैध दारूविक्री सुरू केली असतांना. पोलीस विभागामार्फत अवैध दारूविक्री ला आळा घालण्याचे काम सुरू आहे. अष्यातच हातभट्टी लावून मोफफूलाची दारू काढणाऱ्या दारूविक्रेत्यांवर आळा घालण्यासाठी गेलेल्या कोठारी पोलीस स्टे. चे ठाणेदारावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून आरोपी फरार झाले आहेत 

सदर घटना कोठारी पोलीस स्टे. हद्दीत कवडजई येथे 26 ऑगस्ट रोज सोमवार ला 3:00 वाजताच्या सुमारास घडली असून ठाणेदार संतोष अंबिके जखमी असून चंद्रपूर येथे मानवटकर  रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कडवजई गावाशेजारी जंगलातील नाल्याजवळ मोहफुलाची दारू काढण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच धाड टाकून पकडण्यासाठी ठाणेदार संतोष अंबिके व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले असता विशाल राजकुमार पोराते यांनी ठाणेदारावर कुऱ्हाडीने वार केला. कुऱ्हाड कुऱ्हाड ऊगारताच ठाणेदाराणे बचावात्मक पर्याय घेतला मात्र तरीही कुऱ्हाड त्यांच्या डोक्यावर लागली. 

ठाणेदार रक्तबंबाळ झाले व स्वतः ला आवरून आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीनी तिथून जंगलात पळ काढला. जखमी ठाणेदारास कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपचार्थ आणले व सध्याला चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. 

या घटनेत आरोपी विशाल राजकुमार पोराते, विश्वास मंडळ व इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला  असून पोलीस प्रशासन फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत. 


यापूर्वी कोठारित अवैध दारूविक्री करण्या-यांची टोळी पोलिसांना ढकलून पाडण्याची घटना ताजी असतांना ह्या प्रकारामुळे पोलिसांत अवैद्य धंदेवाल्यांची प्रचंड भीती निर्मान झाली आहे. यातच कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके यांना डोक्यावर जबर मार लागल्याने जखमी झाले त्यांना तात्काळ चंद्रपूर  दवाखान्यात भरती करण्यात आले तिथे इलाज चालू आहे. 

कोठारी पोलीस स्टेशन चा हद्दीत ही दुसरी घटना आहे ह्या अगोदर ही एका महिला पोलीस शिपाई वर ही हमला करण्यात आला होता. ही घटना काल दि. 26आगस्ट रोजी 2ते 3दरम्यान झाली. आरोपी वर कलम 307.357.332(34)अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.