चितळाची शिकार करून मांस विक्री : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या छाप्यात चितळाच्या मुंडक्या सहित जप्ती : एक आरोपी अटकेत इतर फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चितळाची शिकार करून मांस विक्री : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या छाप्यात चितळाच्या मुंडक्या सहित जप्ती : एक आरोपी अटकेत इतर फरार

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर -राजुरा प्रतिनिधि-शोएब शेख 

राजुरा वनपरिक्षेत्रांर्गत असलेल्या विहिरगाव उपक्षेत्रातील सिंधी गावातील बापूजी सीताराम कोडापे, वय 52 यास अटक केली असून इतर  आरोपी फरार झाले असून शोधमोहीम सुरु आहे.


एका घरात चितळाची शिकार करून मांसाची विक्री करण्यासाठी चितळ कापण्यात येत असल्याची माहिती राजुरा वन विभागाला निनावी दूरध्वनी कॉल मार्फत मिळाली होती त्या माहिती वरून तात्काळ कारवाही करीत वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक प्रियंका वेलमे, वनरक्षक सुलभा उरकुडे, सीमा तुरणकर, संदीप कमलापूवार, सुनील मेश्राम आणि वनमजूर लुटारू रोहन रमेश टेकाम यांनी कोडापे यांच्या घरी धाड टाकली.

दरम्यान चाहूल लागताच सर्व आरोपींनि पळ काढला, परंतु घटनास्थळी चितळाचे मुंडके, चार पाय, 4 किलो मास, कुऱ्हाड, फासे, सूरी आदी साहित्य आढळून आल्याने तत्काळ पंचनामा करुन सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले,असुन ह्या प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

आरोपी पळुन जाण्यात यशस्वी ठरल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवुन प्रयत्नपूर्वक शोध घेत   बापूजी सीताराम कोडापे  या आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळविले तसेच इतर फरार आरोपीचा शोध सुरु आहे.