चंद्रपूर जिल्हा शिव वाहतूक सेनेतर्फे ऑटो सजावट स्पर्धेचे दमदार आयोजन व विजेत्यांना पुरस्कार वितरित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा शिव वाहतूक सेनेतर्फे ऑटो सजावट स्पर्धेचे दमदार आयोजन व विजेत्यांना पुरस्कार वितरित

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर  येथे  शिव वाहतूक सेने तर्फे आज दिनांक 25/8/2019 ला ला कॉलेज ग्राउंड दे गो तुकूम ऑटो सजावट कायक्रम घेण्यात आला. यात जिल्ह्यातील अनेक ऑटो चालक मालकांनी सहभाग घेऊन स्पर्धेत रंगत आणली.


ऑटो चालकांकरिता विविध अटी व शर्थीसोबत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 100पेक्षा अधिक ऑटोरिक्षा चालक आपल्या वाहनासहित उपस्थित होते. 

स्पर्धेचे परीक्षक म्हणून ऑटो संघटनेचे नेते अब्बास भाई ज्ञानेश्वर हुंमणे व विदर्भ ऑटो संघटनेचे लोहकरे यांनी परीक्षण केल्यानंतर, या स्पर्धेत पहिले बक्षीस रोख 10 हजार भद्रावती येथील रामदास सपकाळ Mh/34/D/8289 यांनी, दुसरे बक्षीस 5 हजाराचे बक्षीस मंगेश गजर यांना  Mh /34/Bh/7014 आणि तिसरे बक्षीस अश्विन देवानंद कराडे दुर्गापूर  2 हजार  रोख असे ऑटो चालकांनी स्पर्धा परीक्षणानंतर वितरित करण्यात येऊन वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी त्यांना मार्गदर्शक करण्यात आले.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नगरसेवक सुरेश भाऊ पचारे पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीसउपनिरीक्षक रवींद्र नाईकवाड, महिला संघटिका कुसुमताई उदार, तेलतुंमडे,संतोष नरूले, निलेश बेलखेडे, विक्रांत सहारे यांच्या सहित अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन  वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख सय्यद रब्बानी चिस्थि, उप जिल्हा प्रमुख  बंडू हजारें यांनी केले व सोबतच वाहतूक पदाधिकरी संतोष उपाध्याय, तालुका अध्यक्ष रमेश ब्राम्हणकर, अशोक चिरखरे,आतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.