हजारोंच्या उपस्थितीत माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप :गंगा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक करून उर्वरित खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हजारोंच्या उपस्थितीत माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप :गंगा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक करून उर्वरित खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार

Share This
-सर्व पक्षातील राजकीय मंडळींची उपस्थिती.
-गंगा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक करून उर्वरित खर्च पूरग्रस्तांना मदत.

खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा 24 आँगस्ट 

जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते.राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ,लोकनेते ,प्रभाकरराव मामुलकर यांच्यावर आज ठीक तीन वाजता शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी सर्व पक्षातील दिग्गज राजकीय मंडळी तसेच हजारो नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते ,विद्यार्थी उपस्थित होते. जड अंतकरणाने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले.अंत्यसंस्कारानंतर दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली घेण्यात आली.


यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया , काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार,खासदार बाळू धानोरकर ,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ,आमदार एडवोकेट संजय धोटे ,माजी आमदार सुभाष धोटे, सुदर्शन निमकर ,एडवोकेट वामनराव चटप ,डॉक्टर रजनीताई हजारे ,नंदाताई अलवार ,माजी आमदार देवराव भांडेकर ,जैनुद्दीन जव्हेरी ,बाबासाहेब वासाडे ,नगराध्यक्ष अरुण धोटे ,राजेंद्र वैद्य ,संदीप गड्डमवार गजानन गावंडे ,दादा पाटील लांडे ,जगन्नाथ चने,सतीश धोटे ,सुरेश महाकुलकर ,देवेन्द्र बेले ,सूर्यकांत खनके ,उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे ,जिल्हा परिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके, विनायक बांगडे ,अशोक नागापुरे ,अविनाश ठावरी ,वसंत मांढरे ,नसीर खान ,अाबीद अली ,सिद्धार्थ पठाडे , व्ही डी मेश्राम,सभापती कुंदा जेनेकर , जिल्हा परिषद सदस्य मेघाताई नलगे,एडवोकेट अरुण धोटे ,माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार , हमीदभाई,किशोर रायपुरे ,बोंगीरवार ,सिराज खान ,केशव तिरानिक ,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुधाकर कुन्‍दाेजवार,एडवोकेट मुरलीधरराव धोटे ,श्रीधरराव गोडे ,दत्तात्रय येगीनवार ,जसविंदरसिंग धोत्रा ,अविनाश जाधव ,साजिद हुसेन बियाबानी ,माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे ,प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड , माजी विध्यार्थी संघाचे सचिव बादल बेले यांच्यासह हजारो नागरिक अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

पूर पीडितांना मदतीचा हात.

गंगा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक करून उर्वरित रक्कम कोल्हापूर सांगली सातारा येथे पूरग्रस्त  पीडित कुटुंबीयांना मदत म्हणून देण्याचं घोषणा करण्यात आली. माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनीही समाजसेवेचा वसा घेऊन सामाजिक व राजकीय जीवनाला प्रारंभ केला होता. तोच वारसा पुढे चालवीत श्रीमती सुमनताई प्रभाकर मामुलकर ,सुधीर दौलतराव नलगे ,अविनाश नारायणराव जाधव ,अभिजीत बबनराव भुते आणि आप्तेष्टांनी गंगा पूजनाचा कार्यक्रम थोडक्यात आटपून कार्यक्रमाचे जास्त जास्त उर्वरित निधी पूर पीडितांना देण्याचे जाहीर केले .माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन येत्या दोन-तीन दिवसात राजुरा येथे करण्यात येणार आहे.