पोंभुर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंकेशवर कासर्र्ला अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पोंभुर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंकेशवर कासर्र्ला अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

प्रसूती रजा कालावधीतील पगार काढण्यासाठी २ हजारांची लाच घेताना पोंभुर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंकेशवर कासर्र्ला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.

तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून दोघेही पती - पत्नी शिक्षक आहेत. तक्रारदाराची पत्नी 2018-19 या सत्रात पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. 


जुलै 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत आजारी तथा बालसंगोपन रजेवर असल्याने पत्नीचे मुख्याध्यापकामार्फत गटशिक्षणाधिकारी यांना रितसर अर्ज केला होता. तक्रारदाराच्या पत्नीचा जुलै 2018ते ऑक्टोबर 2018 या कालावधीतील वेतन काढण्यासाठी पंचायत समितीचे गटशिक्षााधिकारी त्र्यंबकेश्वर कासर्र्ला यांना भेटले. 

जुलै 2018 ते ऑक्टोबर 2018 या रजाकालावधीचे वेतन काढण्याकरीता 3 हजार रूपये लाचेची मागणी कासर्र्ला यांनी केली. याबाबत वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली.

वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांनी गोपनियरित्या शहनिशा करून काल 22 ऑगस्ट रोजी सापळा रचला. कारवाईदरम्यान  कासर्र्ला यांनी तडजोडीअंती 2 हजारांची लाच स्वकारली. 

यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.  कासर्र्ला यांच्याविरूध्द रामनगर चंद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील निवासस्थानाची झडतीसुध्दा घेण्यात आली.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक गजानन विखे यांच्या मार्गदर्शनात  पोलिस निरीक्षक सुहास चौधरी ,अतुल वैद्य, रोशन निंबोळकर, सागर भोसले, प्रदिप कुचनकर, चालक निलेश महाजन यांनी केली आहे.