बल्लारपूर शहरात अस्वलीचा शिरकाव : जेरबंद करण्यात वनविभागाला यश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर शहरात अस्वलीचा शिरकाव : जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -
शहरात मध्यरात्रीपासून अस्वलाने शिरकाव केल्याने खळबळ निर्माण झाली होती.  मात्र जलद बचाव दलाने मोहीम राबवून अस्वलाला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 


शहरात रात्री  पासून वस्ती विभाग सराफा परिसरामध्ये  अस्वल दिसून आले. तेव्हा पासूनच सोशल मीडिया वर व्हिडिओ वायरल झाला.काही  स्थानिकांनी फोन द्वारे वनपरीक्षेत्र अधिकारी थीपे यांना कळविले असता थीपे यांनी मध्य चांदा वन विभाग वरून (RRT) जलद बचाव दलाला  पाचारण केले. 

अस्वलाने  वस्ती विभागात धुमाकूळ घालून रेल्वे रूळ पार करून थेट वनविभागाचा डेपो मध्ये शिरला. तेथे जलद बचाव दलाने  अर्धा  ते पाऊण तासातच अस्वलाला पिंजऱ्यात कैद केले. यामुळे नागरिकांनी सूटकेचा श्वास  घेतला. या वेळी वन वनविभागाचे  अधिकारी थीपे , वनपरिक्षेत्र अधिकारी हिरे, वीरूटकर व  सर्व कर्मचारी उपस्थित होते.