ब्रेकिंग न्यूज : बुद्धगिरी टेकडीवरून बुद्ध मूर्तीची चोरी :चार दिवसानंतर घटना उघडकीस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : बुद्धगिरी टेकडीवरून बुद्ध मूर्तीची चोरी :चार दिवसानंतर घटना उघडकीस

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल प्रतिनिधी 


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बुद्धगिरी टेकडीवरून काही समाजकंटकांनी चक्क बुद्ध मूर्तीच चोरून नेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.                                                   
               


या घटनेनंतर बौद्ध समाजबांधवांत रोष पसरला असून, अनेक अनुयायांनी तिथे मोठी गर्दी केली आहे. 

तेथील काही बौद्ध भिखू 20 तारखेला सकाळी वंदना करीत होते. त्यानंतर ते चंद्रपूर करिता रवाना झाले, त्यानंतर रात्री 10:30 वाजताच्या सुमारास बुद्ध मूर्तीकडे वंदना करण्याकरिता गेले असता, तिथे बुद्ध मूर्ती दिसून आली नसल्याने बुद्ध भिखू ने शोधाशोध केली. 

मात्र मूर्ती कुठेही दिसून आली नाही. याची माहिती समाज बांधवांना मिळताच, सर्व बौद्ध समाजबांधव एकत्र झाले असून, त्या ठिकाणी चोरट्या बद्दल रोष निर्माण करून, चौकशी करून अश्या चोरट्याचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याची मागणी बौद्ध अनुयायी करीत आहे.