चंद्रपूर शहरात अवैद्यरित्या रेतीची वाहतुक आणि साठवणूक करणाऱ्या तस्करां विरूध्द मोक्का कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी - मनोज पाल,शहर प्रमुख, महानगर-चंद्रपूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर शहरात अवैद्यरित्या रेतीची वाहतुक आणि साठवणूक करणाऱ्या तस्करां विरूध्द मोक्का कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी - मनोज पाल,शहर प्रमुख, महानगर-चंद्रपूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीची वाहतुक आणि साठवणूक सुरू आहे रेतीची वाहतुक करण्याकरिता टि.पी आवश्यक असते पण हि रेतीची वाहतुक करण्याकरिता रेती तस्कर एका टि.पी वापरून  अवैद्यरित्या दिवसभर वाहतुक करतात तसेच रेतीची वाहतुक ही फक्त साय. ६:०० वाजतापर्यंत करता येत असताना शहरात साय. ६:०० वाजाताच्या नंतरही सुरू आहे.


यासंदर्भात आज दि.२०/०८/२०१९ रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी या गंभीर विषयाबाबत सकारात्मक चर्चा ही करण्यात आली आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी कठोर कारवाई करण्याची तसेच शहरातील ज्या भागातून रेतीची तस्करी होत आहे तेथे सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन ही यावेळी दिले

जास्तीत जास्त रेती तस्कर हे अवैद्यरित्या मध्यरात्री आपली रेतीची वाहतुक करून आपल्या दुकानात अवैद्यरित्या साठवणूक करून ठेवतात म्हणूनच अवैद्यरित्या रेतीची वाहतुक आणि साठवणूक करणाय्रा तस्करांच्या मुसक्या आवळ्याकरिता मोक्का कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात होणे गरजेचे आहे  - मनोज पाल,शिवसेना शहर (महानगर) प्रमुख, चंद्रपूर. 

यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हासंघटिका मायाताई पटले,शहर संघटिका वर्षाताई कोठेकर,उपशहरप्रमुख तापोश डे,पप्पू बोपचे,श्रीकांत दडमल,शालिनीताई महाकुलकर,अनिता सेन गुप्ता,कल्पना मंडल,शुव्रा संवर,मंजू सरकार तसेच इतर पदाधिकारी,शिवसैनिक व महिला यावेळी उपस्थित होत्या..