विविध संघटनांचे आज चंद्रपूर बंद : बळीराज धोटे प्रकणात आंदोलन कर्ते राजू झोडे सहित अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विविध संघटनांचे आज चंद्रपूर बंद : बळीराज धोटे प्रकणात आंदोलन कर्ते राजू झोडे सहित अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

बळीराज धोटे अटक प्रकणात आज सर्व सामाजिक व राजकीय विरोधी पक्ष एकत्रित येऊन चंद्रपूर बंद चे आवाहन केले असून अनेक क्षेत्रातील कार्यकर्ते या दडपशाही विरोधात बंद दरमान्य चंद्रपूर सिटी पुलिस ने आंदोलनकर्मी कार्यकर्ते  राजू झोडे ,अदिवक्ता फ़रहत बेग,सुर्या अडबाले,सुनिल भोयर ,प्रो नाहिद हुसैन ,बाबूराव पारखी इत्यादी कार्यकर्त्यांना सिटी पुलिस स्टेशन जवळ अटक करण्यात आली आहे.

याप्रसंगी खासदार धानोरकर यांची उपस्थिती होती. धोटे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना धोटे यांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह ३५ संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला.