सरिता मालू यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार2019 प्रदान : नॅशनल एंटी हराशमेंट फाऊंडेशन आणि एक सखा सोशल वेल्फेयर सोसायटी भोपाल द्वारा पुरस्कार वितरित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सरिता मालू यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार2019 प्रदान : नॅशनल एंटी हराशमेंट फाऊंडेशन आणि एक सखा सोशल वेल्फेयर सोसायटी भोपाल द्वारा पुरस्कार वितरित

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -
    
नॅशनल एंटी हराशमेंट फाऊंडेशन आणि एक सखा सोशल वेल्फेयर सोसायटी भोपाल ( मध्यप्रदेश ) द्वारा देशातील 80 विभूतींना नेशनल प्राईड अवॉर्ड 2019 नी भोपाल शहरातील दा मार्क हॉटल इन क्लब मध्ये रविवार दिनांक 25 ऑगस्टला गौरविण्यात आले.


कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ADG( पोलिस मध्यप्रदेश) श्री . पवन जैन , आणि बॉलिवुड सेलिब्रिटी मुंबईचे श्री .अरुण वर्मा (खल नायक , हेरोपंती , खाकी फेम ) , मिस मल्टीनेशनल इंडिया 2017 शेफाली शर्मा , कतार देशाचे श्री एम .एस बुखारी , दिल्लीचे किशोर कुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते . 
         
सदर राष्ट्रीय स्तरीय कार्यक्रमात चंद्रपुर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती सरिता मालू यांच्या सामाजिक कार्याचा आलेख पाहून त्यांना " राष्ट्रीय प्राईड अवार्ड 2019 " हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला .या गौरव सोहळयासाठी भोपाल येथे सरिता मालू यांचे चंद्रपूर व गडचिरोल्ली जिल्ह्ययातील अनेक मित्रप्रेमी उपस्थित होते. 
       
सरिता मालू यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ह्या पुरस्कारा सोबत प्रमाण पत्र व गौरवचिन्ह देण्यात आले  पुरस्काराबद्दल मित्रवर्गाकडून त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.