विना अनुदानित शाळा व महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विना अनुदानित शाळा व महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र शासन निर्णय :
विना अनुदानित शाळा व महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून ज्या शाळांना आधी 20टक्के अनुदान देण्यात येत होते त्यांना आता 40टक्के अनुदान मिळणार आहे.
गेल्या आठवड्याभरापासून कायम विना अनुदानित शाळा व महाविद्यालयांना अनुदानित करण्यासाठी शिक्षक व अनेक शिक्षक संघटना तीव्र आंदोलन करीत असून आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या अनेक शिक्षकांनी संयम सोडत मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवासस्थानी धडक देण्याच्या प्रयत्न केला असताना त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात येऊन अनेक शिक्षक जखमी झाले होते.तर शिक्षक आमदारांनी विधानभनासमोर ठिय्या देऊन तीव्र रोष व्यक्त केला होता.

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या तीव्र आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटायला सुरुवात होताच मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा राज्य सरकार देऊ पाहत आहे.