राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 13 सप्टेंबर ? 13 ऑक्टोबर ला मतदान ? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 13 सप्टेंबर ? 13 ऑक्टोबर ला मतदान ?

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र- 
राज्यातील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या 13 सप्टेंबरला लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 12 सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी झाल्यानंतर 13 सप्टेंबर रोजी केंद्रिय निवडणूक आयोग राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू शकते अशी शक्यता आहे. 



13ऑक्टोबर रोजी मतदान व दिवाळीपूर्वी मतमोजणी होऊ शकेल असे जाणकारांचे मत आहे. राज्यातील सर्वच राजकिय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. तर राज्यातील जनतेचे डोळे आचारसंहिता केव्हा लागू होणार याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात 2014 च्या निवडणुकीसाठी 15ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले होते.तर मतमोजणी 19ऑक्टोबर करण्यात आली होती. गेल्या निवडणुकीची आचारसंहिता 12 सप्टेंबरला लागू झाली होती. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपत असून, आहे. तत्पुर्वी निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगास क्रमप्राप्त आहे. 2014च्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सवाची सांगता येत्या 12 सप्टेंबर रोजी होत आहे. 
     
राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने सुरक्षेवर पडणारा ताण लक्षात घेवून गणेशोत्सवाच्या आसपास निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होवू शकतो. 25 ऑक्टोबर पासून दीपावली सण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होवू शकते.



त्यामुळे येत्या 13सप्टेंबर राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यानुसार 18 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द होवू शकते. तर ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात म्हणजेच 13ऑक्टोबर रोजी मतदान होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.


  • Sharead Web Hosting Service -One's website is placed on the same server as many other sites, ranging from a few sites to hundreds of websites. Typically, all domains may share a common pool of server resources, such as RAM and the CPU. The features available with this type of service can be quite basic and not flexible in terms of software and updates. Resellers often sell shared web hosting and web companies often have reseller accounts to provide hosting for clients.