तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा : बँकेच्या 1लाखाच्या कर्जामुळे चिंताग्रस्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा : बँकेच्या 1लाखाच्या कर्जामुळे चिंताग्रस्त

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना 

तालुक्यातील सोनुर्ली येथीलरहिवासी  शंकर बबन पारखी वय 33 या तरुन शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन काल दिनांक 24 ऑगस्ट 2019 रात्री विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

पारखी यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर जमिन असुन 65वर्षीय वृद्ध वडिलांचा व कुटुंबाचा ते एकमेव आधार होते. 

काल शेतातफवारणी करुन सायंकाळी घरी जेवन केल्यानंतर रात्रीच्या वेळी विष प्राशन केले आणि घरच्या छतावर झोपी गेले. रात्रीच  घराच्या मंडळीनी शोधाशोध केली असता शंकर बेशुद्ध अवस्थेत आढळला त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे रात्री 2 वाजता नेले असता वैद्यकीयअधिकारी यांनी शंकरला मृत्यु घोषित केले.

मृतकावर  इंडिया बॅक वनसडिचे एक लाख पिक कर्ज असल्याचे समजते. त्यांच्या  पश्चात  पत्नी व दोन मुले व  म्हातारे आई वडिल आहेत. 
x