कृत्रिम प्लास्टिक अंडी आहारात मिळाल्याचा संशयाने राजुरा शहरात माजली खळबळ :न,प, मुख्याधिकारी कडे ग्राहकाची तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कृत्रिम प्लास्टिक अंडी आहारात मिळाल्याचा संशयाने राजुरा शहरात माजली खळबळ :न,प, मुख्याधिकारी कडे ग्राहकाची तक्रार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

काही दिवसांपासून सोशल मीडियावर   एक विडीओ व्हायरल होत असुन तो कृत्रिम बनावटी अंडे हे कशाप्रकारे बनविण्यात येते याची माहिती त्या विडीओ मध्ये आहे बनावटी कृत्रिम अंडे बनवून ते बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत त्यांना ओळखण्यासाठी विशिष्ट पद्धतीने माहिती दिली आहे त्यामुळे हे अंडे मानवी आहारात समावेश झाल्याने आरोग्यासाठी हानिकारक आहे असे त्या  व्हायरल विडीओ मध्ये नमूद आहे.


असे असताना राजुरा येथील  शिवाजी नगर परीसरात एका दुकानातून अंडे विकत घेऊन ते घरी नेलें त्यांना उकळून त्याची भाजी केली, जेवण्यासाठी घरीची मंडळी बसली असता मोठा मुलगा अमोल यांच्या आहारात आलेले अंडे हे सामान्य पेक्षा विचित्र वाटले त्याने ह्य अंड्याला बारकाईने बघितले तर हे त्याला जाणवलं की हे अंडे खरोखरच नसुन तो एक कुञिम पध्दतीने तयार केलेले  असल़्याचे  असल्याचे संशय व्यक्त झाला.

लगेच त्याने व्हायरल सोशल मीडियावर तो विडीओ बघीतले असता व्हायरल विडीओ सांगितलेल्या  सर्व गोष्टी ह्या आहारात समावेश असलेल्या अंड्यात मिळत असल्याने ह्याबाबत अमोल सदाशिव राऊत ने यांची तक्रार दिनांक 31 मे 2019 रोज शुक्रवार ला,  थेट राजुरा नगर परिषद  मुख्याधिकारी यांच्या कडे केली.

दुकानातून अंडे विकत घेऊन घरी नेलें सांय घरातील सर्व मंडळी जेवणास बसली होती तेव्हा अमोल च्या ताटात बनावटी कुञिम अंडे आढळून आले अमोलने हि सगळी बाब दुकानदाराला सांगितले नंतर ह्या संदर्भात न प मुख्याधिकारी यांची तक्रार केली आहे या अंड्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो असुन यामागे सत्यता पडताळून खरंच हे अंडे कृत्रिम पध्दतीने तयार करण्यात आले की हा तक्रार कत्याचा भ्रम आहे या संदर्भात खुलासा करावा दोषी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जात अमोल सदाशिव राऊत यांनी केली आहे.