शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची मा आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस औचित्य भगवा सप्ताहाची आखणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची मा आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस औचित्य भगवा सप्ताहाची आखणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - चंद्रपूर शहर प्रतिनिधी -

शिवसेनेचे नेते व युवासेना अध्यक्ष माननीय आदित्य ठाकरे यांच्या 13जून वाढदिवसानिमित्य भगवा सप्ताहाचे औचित्य साधून  चंद्रपूर  जिल्हा प्रमुख श्री संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली भगवा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाकरिता आज दिनांक 9जून 2019 ला दुपारी 12 नंतर शासकीय विश्राम गृह येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक पार पडली.

I have a humble appeal to all well wishers: pl don’t put legal/ illegal banners on my birthday. Instead of spending on it, pl continue our work in drought hit areas, work for the environment and for the society at large. I only look forward to your love & blessings.
             

माझी नम्र विनंती आहे, कृपया माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलेही कायदेशीर/ बेकायदेशीर बॅनर लावू नये. त्यावर पैसे खर्च करण्याऐवजी, दुष्काळग्रस्त भागात सुरु असलेले आपले कार्य चालू ठेवा, पर्यावरणासाठी/ समाजासाठी काम करा. दरवर्षीप्रमाणे, मला आपले प्रेम आणि आशिर्वादच महत्वाचे आहेत!


6 जून 2019 रोजी ठाकरे यांनी त्यांच्या सर्व अधिकृत सोशल माध्यमांवर त्याच्या वाढदिवसाला कोणताही नाहक खर्च करण्यापेक्ष्या दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हाथ पुढे करा अशी सामाजिक अपील केल्याने जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना भगवा सप्ताह साजरा करून सामाजिक कार्ये पार पाडण्याच्या उद्देशाने ही बैठक महत्व्हाची ठरली. 

                

या बैठकीत जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यासह सचिन भोयर, युवासेना जिल्हाप्रमुख, कमलेश शुक्ला पाणीपुरवठा सभापती - नप बल्लारपूर,मुसुल शेख - नगरसेवक,  सुधाकर ताम्हाण, बंडूभाऊ हजारे- माजी नगरसेवक ,प्रमोद पाटील, वासिम शेख, उर्मिला जोगी, विकास वीरूटकर, विक्रांत सहारे, रवींद्र गटलेवार, रोहित नलके, आशिष कवटवार, विनोद चांदेकर, बंटी घोरपडे, अनुप कोगरे, हेमराज बावणे, भुवन सल्लम, गणेश ठाकूर, नितूसिंग बावरे, प्रकाश पाठक, बाबा साहू, संदीप बोरकर, उमेश भगत, उमेश कुंडले, शंकर पाटेवार, विद्या ठाकरे, कल्पना गोरघाटे, हेमराज बावणे, अजय कोंडलवार, अस्लम भाई, कुसुमताई उदार, विजय ठाकरे, निलेश बेलखेडे, अक्षय बेलखेडे, बबन उरकुडे सहित अनेक शिवसैनिक उपस्थित होते.