वणी-अंतरगाव(बु)-गडचांदूर बससेवा सुरू : भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या अथक प्रयत्नांना यश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वणी-अंतरगाव(बु)-गडचांदूर बससेवा सुरू : भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या अथक प्रयत्नांना यश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -
वणी-शिंदोला-वनोजा-अंतरगाव(बु)-आवळपूर-गडचांदूर हि बससेवा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या अथक पाठपुराव्याने व पत्रव्यवहाराने सुरू झाली आहे.


यासाठी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार व  राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांच्या माध्यमातून भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे यवतमाळ विभागीय नियंत्रक,विभागीय वाहतूक नियंत्रक व वणी आगार प्रमुख यांचेकडे सातत्याने मागणी मागील २ वर्षांपासून केली होती.त्यांच्या या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सदर बससेवा प्रवाश्यांच्या सोयीसाठी सुरू केलेली आहे.सदर बससेवा वणी वरून सायंकाळी 5 वाजता शिंदोला मार्ग गडचांदूर करीता निघणार आहे.तसेच सदर बससेवा गडचांदूरला मुक्कामी थांबून सकाळी 6 वाजता वणी करीता निघणार आहे.
             
कोरपना तालुक्यातील बिबी,नांदा,आवळपूर,हिरापूर,सांगोडा,अंतरगाव(बु),काढोली(खुर्द),नारंडा,वनोजा व वणी तालुक्यातील कळमना,पात्र, परमडोह, शिंदोला येथील नागरिकांना वणी येथे जाण्यासाठी एकही थेट बससेवा उपलब्ध नव्हती.गडचांदूर परिसरातील नागरिकांना वणी येथे जाण्यासाठी शिंदोला मार्ग अतिशय जवळचा पडतो.परंतु बससेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कोरपना मार्ग फेरा मारून वणी गाठावी लागत असे त्यामुळे प्रवाश्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असे,त्यामुळे सदर बससेवा सुरू करण्यात यावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी मागणी केली होती,सदर मागणीची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी महाराष्ट्र  राज्य परिवहन महामंडळाकडे वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू केला त्यामुळे सदर बससेवा प्रवाश्यांच्या सोयीकरीता सुरू करण्यात आली आहे. 
     
सदर बससेवा सुरू झाल्यामुळे वणी जाण्याकरिता प्रवाश्यांना सोयीचे झाले आहे.तसेच त्यांच्या वेळेची व पैश्यांची बचतसुद्धा होणार आहे.बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    

सदर बससेवा सुरू झाल्यामुळे शक्ती केंद्र प्रमुख सत्यवान चामाटे,  नारंडा सरपंच वैशाली गेडाम,वनोजा सरपंच सविता पेटकर,हिरापूर सरपंच प्रमोद कोडापे, नारंडा उपसरपंच अनिल शेंडे,सांगोडा उपसरपंच विजय लांडे,बंडू पाटील वडस्कर,सुरेश पाटील परसुटकर,बाळा पंदिलवार,अजय तिखट,प्रवीण हेपट,अरविंद खाडे,अरुण निरे,गजानन पचभाई,गजानन मोरे,अमोल भोंगळे यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड.संजयभाऊ धोटे व राज्य परिवहन महामंडळाचे आभार व्यक्त केले आहे.सदर बाससेवेचा लाभ परिसरातील जास्तीच जास्त प्रवाश्यांनी घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी केले आहे.