ॲड.सारीका हिरादेवे यांची कोरपना तालुका नोटरी पदी नियुक्ती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ॲड.सारीका हिरादेवे यांची कोरपना तालुका नोटरी पदी नियुक्ती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चेतन खोके -

महाराष्ट्र शासनाचे विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई च्या वतीने अँड. सारीका हिरादेवे - जेनेकर यांची कोरपना तालुका नोटरी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.


ॲड.सारीका हिरादेवे यांनी कोरपणा तालुक्यातील बाखर्डी या खेडेगावातुन वकिलीचे शिक्षण पुर्ण केले आहे सध्या त्या कोरपणा, राजुरा व चंद्रपूर न्यायालयात वकिली व्यवसाय करित आहे, त्या श्री गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, महिला सामाजिक संस्था अशा विविध सामाजिक संस्था,शासणाचे विविध समित्यांसोबत जुळलेल्या आहेत.त्यांच्या नियुक्तीमुळे वकिल संघटणा, समाजसेवी संस्था आदींचे वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सदर नोटरी नियुक्ती करीता ॲड. हिरादेवे यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.टीम खबरकट्टा तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन 🌷🌷🌷