आर्य वैश्य कोमटी समाज महाराष्ट्र महापरिवार आणि प्रीतम ग्रुप यांच्या संकल्पनेतून सप्तरंग कार्यक्रमाची उधळण व विविध पुरस्कार वितरित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आर्य वैश्य कोमटी समाज महाराष्ट्र महापरिवार आणि प्रीतम ग्रुप यांच्या संकल्पनेतून सप्तरंग कार्यक्रमाची उधळण व विविध पुरस्कार वितरित

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र (नांदेड ):

आज दिनांक 23जून 2019 ला हनुमान मंदिर, जुना मोंढा, जिल्हा नांदेड येथे आर्य वैश्य कोमटी समाज महाराष्ट्र महापरिवार आणि प्रीतम ग्रुप पुणे तर्फे श्री गजानन नंदकुमार गंजेवार यांच्या संकल्पनेतून  समाजातील संपूर्ण महराष्ट्रात  विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरवान्वीत करण्यात आले.


सदर  कार्यक्रमाचे उदघाटन संतबाबा बलविंदर सिंघ बाबाजी, जत्तेदार गुरुद्वारा लंगर, नांदेड यांनी परम पूज्य श्री जगदीशजी महाराज, श्री हनुमान मंदिर, गाडीपुरा नांदेड, उदयोन्मुख मराठी सिनेतारका भाग्यश्री   प्रमुख उपस्थितीत पार पडली कार्यक्रमात अरुण कदमांनी हास्याचा तडका देऊन कार्यक्रमात हास्य रंगत आणली.


श्री हेमंतजी वट्टमवार मुंबई - AVKSM जीवन गौरव पुरस्कार तसेच कु.अर्चना मनोहरराव मेडेवार संभाजीनगर सौ.वैशालीताई मदनराव सातभाई,पुणे,सौ.सारिका रवींद्र मुक्कावार,मुंबई स्नेहलताई श्रीकांत पवितवार,नांदेड.-AVKSM कर्तृत्ववान महिला पुरस्कार या  कार्यक्रमाच्या मुख्य आयोजनाप्रमाणे पुरस्कार व खालील योजनांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

AVKSM सुकन्या सायकल वाटप योजना: 
• कु.गीतांजली हणमंत पदमवार रा.होळी नांदेड. 
•कु.आरुषी अभिजीत वट्टमवार ज्ञानेश्वरनगर नांदेड.
• कु.वैष्णवी दत्तात्रेय रायपत्रीवार देशमुख गल्ली परभणी 
• कु.प्राची उत्तमराव धंम्पलवार वसंतराव नाईक कॉलेज सिडको
• कु.वैष्णवी गोविंद कटकमवार,गवळीपुरा नांदेड.

AVKSM सुकन्या पालक सन्मान योजना:
यात पाच सुकन्या पालकांचा प्रातिनिधिक सत्कार कार्यक्रम संपन्न झाला असुन बाकी पालकांना प्रमाणपत्र आणि त्यांचे बक्षीस वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. 

AVKSM श्री रंगनाथ महाराज शालेय साहित्य वाटप कार्यक्रम या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येईल असे आयोजकांनी कळविले असून श्री मदनराव सातभाई पुणे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण मामीडवार यांनी केले असून GNG ग्रुप चे राहुल पोदुटवार, आर्णी, सागर मुक्कावार, चंद्रपूर, गणेश फुलारी, अजय बीडवई, हॅप्पी सिंग, नांदेड, राहुल चन्नावार , आशीष रुद्रकंठवार, शिर्डी सहित राज्यभरातील सुमारे 500 समाजबांधव उपस्थित होते.