जलयुक्त शिवार योजना नारंड्यात यशस्वी : पहिल्याच पावसात नाल्यात साचले पाणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जलयुक्त शिवार योजना नारंड्यात यशस्वी : पहिल्याच पावसात नाल्यात साचले पाणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -
      
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला खोलीकरण करण्यात आले. या नाला खोलीकरणाचा फायदा पहिल्याच पावसात झाला असून संपूर्ण खोलीकरण झालेल्या भागात पाणी साठले गेले आहे. तसेच या नाल्यावर बंधारा बांधण्यात आल्याने पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. 


या नाला खोलीकरनाच्या माध्यमातून परिसरातील शेतशिवारात जल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जल सिंचन दृष्टया चांगली सोय निर्माण झाली आहे.
          
नारंडा येथे शासनातर्फे सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले या मध्ये गावातील शिवारातील ९ किलोमीटर लांबीचे  ३ नाल्याचे खोलीकरण करण्यात आले.तसेच ७ सिमेंट बंधारे मंजूर झाले असून ६ बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

      
याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आमदार अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून या कामांच्या मंजुरी साठी प्रयत्न केले होते.
      
नाला खोलीकरण व सिमेंट बंधारे यांचे बांधकाम झाल्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी आता अडवून जिरणार आहे त्यामुळे शेतशिवारातील पाण्याची पातळी वाढणार आहे.तसेच नाल्याचे खोलीकरण झाल्यामुळे शेतात जास्त पावसामुळे येणार पूर सुद्धा आता शेतात ज्याण्यापासून अडणार आहे.तसेच ठिकठिकाणी बंधारे बांधल्यामुळे नाल्यातून थेट नदीमध्ये जाणारे पाणी अडणार आहे.यासर्व बाबींमुळे शेतीच्या जलसिंचनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
          
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात ढाळीचे बांध सुद्धा टाकण्यात आले आहे.त्यामुळे शेतातील सुपीक गाळ शेतातमध्येच अडवणूक होऊन शेतातच राहणार आहे.तसेच जमिनीची पोतसुद्धा सुधारण्यास मदत होणार आहे.
     
एकंदरीत जलयुक्त शिवार अभियान योजना ही नारंडा येथे यशस्वी झाली असून येणाऱ्या काळात सुद्धा शेतकरी वर्गाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.तसेच नारंडा येथे जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याबद्दल शक्तीकेंद्र प्रमुख सत्यवान चामाटे,सरपंच वैशाली गेडाम,उपसरपंच अनिल शेंडे,ग्रामपंचत सदस्य मायाताई शेंडे, अजय तिखट,प्रवीण हेपट,अरविंद खाडे,मारोती बोबडे,बंडू गेडाम,बाळा पंदिलवार, अरुण निरे, यांनी आनंद व्यक्त केला आहे.तसेच आमदार अँड.संजय धोटे यांचे आभार व्यक्त केले आहे.