कोरपना नगर पंचायतीच्या इ - निविदा प्रक्रियेत घोळ? : नगरसेवकांची नगर विकास विभागाकडे तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना नगर पंचायतीच्या इ - निविदा प्रक्रियेत घोळ? : नगरसेवकांची नगर विकास विभागाकडे तक्रार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -कोरपना प्रतिनिधी - 
कोरपना नगर पंचायतीमधे विविध योजने अंतर्गत सन २०१६ते २०१९ या वर्षांत अनेक कामे इ-निविदा प्रक्रियेनुसार करण्यात आली, परंतु या मध्ये एका जवळच्या ठेकेदाराला अनेक कामांची लॉटरी लागल्याने ई-निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा तर नाही ना? अशी शंका उपस्थित करून नगरसेवकांनी नगरविकास विभागाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.कोरपना नगर पंचयातला सन २०१६ ते २०१९ या वित्त वर्षात नगरोत्थान योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना, वैशिष्ट्य पूर्ण नगर विकास योजना, जिल्हा नगरोत्थान विकास, साहाय्य अनुदान योजना, १४वित्त आयोग निधी, रस्ता अनुदान निधी, अशा विविध योजनेतून नगर पंचयातला शासकीय निधी मिळाला असुन सदर योजनांची कामे ई-निविदा प्रक्रिया द्वारे आवंटीत करण्यात करण्यात आले, परंतु यामध्ये नगर पंचायतीच्या पदाधिकारी यांचे नातेवाईक असलेले भूषण इटनकर यांना तीन पेक्षा अधीक कामे दिल्याने ठेकेदार व पदाधिकारी यांच्यात संगनमत आहे काय? असा उपस्थित व्यक्त केल्या जात आहे.

शासनाचे एका ठेकेदाराला तीन पेक्षा अधिक कामे देऊ नये आशा आदेश असतांना व नगर पंचायच्या कोणत्याही पदाधिकारी यांचे नातेवाईक नसावे असे असताना इटनकर ठेकेदार यांनी पदाधिकारी नातेवाईक नसल्याचे खोटे शपथपत्र सादर केले. 

चौकशी केल्यास येथील त्या ठेकेदार यांचे नावावर काही नगर सेवकच ठेकेदार म्हणून काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. सदर गावात फार दिवसापासून एकहाती सत्ता असल्याने यांची वचक आहे येथे अन्य कुणी निविदा टाकल्यास त्यांचेवर दबाव आणल्या जातात अशी इतर ठेकेदारात चर्चा आहे. त्यामुळे या नगर पंचायतला अन्य कुणी निविदा यांच्या मर्जी विना भरत नाही. त्याचाच पुरेपूर फायदा घेत आपल्या नातेवाईक वा हितचिंतक यांचे नावाने घेऊन त्या ठेकेदाराला कमिशन वर समाधान मानावे लागते. याच खरा लाभ येथील नामवं नगरसेवकच घेत आहे, याची सखोल चौकशीची मागणी विरोधी नगरसेवकांनी केली आहे. 


भूषण ईटनकर हे येथील न. प. च्या पदाधिकाऱ्यांच्या अगदी जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे प्रत्येक निविदेत हे स्वतःच तीन लोकांचे नावाने निविदा भरून असुन अर्थात त्यामुळेच काम भूषण इटनकर यांचे नावाने दिले जात असल्याची चर्चा आहे.

घनकचरा व्यवस्थापन चा सुद्धा ठेका इटनकर यांचे नावे घेण्यात आला असून येथील मजुरांकडून कळते की यांना पगार एका पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करीत असून फार अत्यल्प पगार देत आहे व तांत्रीक मंजुरी पेक्षा कमी मजूर लावून जास्त मजुरांचे बिल न प कडून उचल केली जात आहे. कचरा उचलण्या करिता गाडी नसताना त्या गाडीचे भाडे व डिझेल ची सुद्धा रक्कम उचल केली असल्याची माहिती न प कडून प्राप्त झाली शहरात पाहणी केल्यास स्वच्छतेचा फार मोठा अभाव असून मात्र शासना कडे निव्वळ कागदोपत्री माहिती सादर करून शासनाची दिशाभूल केली जात आहे. 

याबाबत विरोधी नगरसेवकानी तक्रार दिली असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक सुहेल अली, रेखा चन्ने, सुभाष तुरणकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे,