शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मध्यरात्री अवैधरित्या कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनास थांबवून दिला ठिय्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मध्यरात्री अवैधरित्या कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनास थांबवून दिला ठिय्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा प्रतिनिधी -

कोळसा वाहतुकीमुळे वरोरा शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून शिवसेना जिल्हाप्रमुखाने मध्यरात्री अवैधरित्या कोळसा वाहतूक करणारे ट्रक रोखून धरले.


जिल्ह्याच्या भूगर्भात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती आहे. कोळसा उत्पादनात हा जिल्हा देशभरात सतत अव्वलस्थानी राहिला आहे. जिल्ह्याच्या विकासात कोळसा खाणींचे मोठे योगदान असले तरी प्रदूषणाला आळा घालण्यात अपयश आले. कोळशाचे विक्रमी उत्पादन करताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या समांतर यंत्रणा बिनकामी ठरल्या. 

दिवसेंदिवस होणारा नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास व वाहनांची वाढती संख्या नवीन समस्यांना जन्मास घालत आहे. याला तत्काळ आळा न घातल्याने दरवर्षी हजारो नागरिक बळी जात आहेत.अशातच कोळसा वाहतुकीमुळे वरोरा शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मध्यरात्री अवैधरित्या कोळसा वाहतूक करणारे ट्रक रोखून त्याठिकाणी काही काळ ठिय्या दिला.यामुळे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक ची मोठी रांग रस्त्यावर लागल्याने यामार्गावरील वाहतूक रात्रभर ठप्प झाली होती.

पोलीस प्रशासनानी सदर प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपला निर्णय ठाम ठेवल्याने पोलिसाना परत जावे लागले मात्र या कोळसा वाहतुकीबाबत आमच्या प्रतिनिधी ने वरोरा नगर परिषदेच्या मुख्यधिकारी यांच्याशी बातचीत केली असता जडवाहतुबाबत नगर परिषद लवकरच ठराव घेणार असून रात्रीच्या सुमारास वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी संगीतले.

शहरातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीला कुठलीही परवानगी नसून सुद्धा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळून रात्रीच्या सुमारास राजरोसपणे वाहतूक केल्या जात असून स्थानिक प्रशासनाकडून कुठंहीली कार्यवाही होत नसल्याने काही स्थानिक अधिकाऱ्यांनी याप्रकरणात आपले हात ओले केल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

मात्र यावर प्रशासनामार्फत कठोर पाउल उचलल न गेल्यास शहरात मोठं जनआंदोलन करण्यात येईल  अशी शिवसेनेची भूमिका आहे.