आदर्श शाळेत शाहू महाराज जयंती व पुस्तक दिन उत्साहात साजरा : दहावीतील गुणवंताचा सत्कार व डिजिटल वर्गखोलि चे उद्घाटन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श शाळेत शाहू महाराज जयंती व पुस्तक दिन उत्साहात साजरा : दहावीतील गुणवंताचा सत्कार व डिजिटल वर्गखोलि चे उद्घाटन.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती व पुस्तक दिन तसेच इयत्ता दहावीतल्या गुणवंत विध्यार्थी सत्कार व डिजिटल वर्गखोली चे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भाषकरराव येसेकर प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर साबनानी ,  कोशाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार,  संचालक अविनाश नीवलकर ,   मंगला माकोडे  , मुख्याध्यापिका नलीनी पिंगे   मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर  ,पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, बालवाडीच्या मुख्याध्यापिका  मंगला मोरे आदिंचि प्रामुख्याने उपस्थिती होती. 


सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज व क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी व सहावी या डिजिटल वर्गखोलीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नवोगतांचे स्वागत तसेच इयत्ता पहिली ते सातवी च्या विध्यार्थीना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. दरवर्षी राबवीन्यात येणाऱ्या उपक्रमाप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी पहिला येणाऱ्या दुर्गेश भलमे व साक्षी पुरटकर या विध्यार्थी ना कन्पॉस पेटी भेट देऊन बादल बेले यांनी स्वागत केले. 

याप्रसंगि सत्र 2018-19 मधील इयत्ता दहावीच्या गुनवंत विध्यार्थी ना स्वर्गीय राजय्याजी बेजंकिवार यांच्या स्म्रुतीप्रिथ्यर्थ संस्थेचे कोश्याध्य्क्श प्रकाश बेजंकिवार यांच्या तर्फे  दोन हजार रुपये रोख रक्कम प्रत्येकी चार विध्यार्थीना तर स्वर्गीय रामदासजी चीडे यांच्या स्म्रुतीप्रिथ्यर्थ सन्मानचिन्ह भेट देण्यात आले. 

सतीश धोटे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करतांना विध्यार्थीनी अभ्यासात सातत्य ठेऊन कठोर परिश्रम घेऊन यश प्राप्त करावे तसेच शिक्षकांनी अद्यावत माहिती चा वापर करीत विध्यार्थीचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी कांबले यांनी तर प्रास्तावीक मुख्याध्यापिका नलीनी पिंगे यांनी केले. आभार अर्चना मारोटकर यांनी मानले.