सामाजिक : गौशाळेच्या शेड चे बांधकाम जिल्हा परिषद निधीतून करण्याची सुनील उरकुडे यांची मागणी त्वरित मंजूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सामाजिक : गौशाळेच्या शेड चे बांधकाम जिल्हा परिषद निधीतून करण्याची सुनील उरकुडे यांची मागणी त्वरित मंजूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा प्रतिनिधी -

चुनाळा येथे सामाजिक संस्ते मार्फत चालवण्यात येत असलेल्या गोशाळेतील जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन सद्य स्तितीत ह्या गोशाळेतील जनावरांची संख्या 125 च्या आसपास पोहोचली आहे.

जनावरांच्या वाढ्त्या संख्ये मुळे येथील व्यवस्था अपुरी पडत असल्याने संचालकांना एवढ्या मोठया प्रमाणात कमी जागेत जनावरे पोसणे कठीण जात आहे.याची समस्या संचालकांनी  जि. प सदस्य सुनिल उरकुडे यांना व्यक्त केली होती. नेहमी या गोशाळेला भेट देऊन मदतीचा हाथ देणारे उरकुडे यांनी आज जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार ह्यांचेकडे ह्या जनावराकरीता जि. प निधी अंतर्गत शेड बनवुन देन्याची मागणी केली.

सभापतीनी त्यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देउन कार्यवाहीचे आश्वासन दिले. 

सदर गोशाळा उरकुडे ह्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसुनही त्यानी सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेउन केलेल्या ह्या प्रयत्नाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.