चंद्रपूर –
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या सुचने नुसार आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पक्ष संघटनेची आढावा बैठक मा. प्रा. वसंतराव पुरके, माजी मंत्री, मा. आ. श्री. विरेन्द्र जगताप, मा. खासदार बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 14 जूनला इंटक भवन, डी. आर. सी. हेल्थ क्लब समोर चंद्रपुर येथे संपन्न झाली.
सकाळी 11:00 वाजता ब्रम्हपुरी / सावली विधानसभा,
दुपारी 12:00वाजता चिमुर विधानसभा,
दुपारी 01:00वाजता राजुरा विधानसभा,
दुपारी 02:00वाजता वरोरा / भद्रावती विधानसभा,
दुपारी 3:15वाजता बल्लारशा / मूल विधानसभा,
दुपारी 04:00वाजता चंद्रपुर विधानसभाची यानुसार बैठकी पार पडल्या.
सदर बैठकीत चंद्रपूर विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली त्यावेळेस कांग्रेसकडून प्रवीण पडवेकर, अश्विनी खोब्रागडे, शालिनी भगत, संजय रत्नपारखी, निलेश खोब्रागडे यांनी आपली दावेदारी उपस्थित पक्ष निरीक्षकांसमोर मांडली, यावेळेस मागील विधानसभेचे उमेदवार मंगेश मेंढे यांची अनुपस्थिती अनेकांच्या उत्सुकतेचा विषय होती.
इच्छुक उमेदवारांनी पक्ष संघटनेचं कार्य, लोकसभा निवडणुकीत केलेला प्रचार याबाबत उमेदवारांची चाचपणी करण्यात आली, कांग्रेसतील एका गटाने चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी स्थानिक कार्यकर्त्याला देण्यात यावी बाहेरील उमेदवाराला देऊ नये असा तगादा लावला.