जागतिक पर्यावरण दीनानिमित्त वनराई बंधार्यांचि निर्मिती :
वनपरीक्षेत्र कार्यालय राजुरा व जीवनदीप सर्पमीत्र व पर्यावरण संस्थेचा संयुक्त उपक्रम.
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा विशेष प्रतिनिधी ):
जागतिक पर्यावरण दीनाचे अवचीत्य साधून मध्यचांदा वन विभाग चंद्रपूर वनव्रूत्त वनपरीक्षेत्र कार्यालय राजूरा व जीवनदीप सर्पमीत्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्था राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा येथे तीन वनराई बंधारे बांधण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करतांना उपविभागिय वनअधिकारी ए.बी.गर्कल म्हणाले दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत आहे.त्यामुळे प्रत्येकाने पाणी जपून व आवश्यक तेवलेच वापरले पाहिजे. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला सर्वांनी अधिक गती दिली पाहिजे.जेणेकरुन भविष्यात पाण्याची टंचाई होणार नाही.
वनपरीक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवून जीरवले जाईल. जेणेकरून पाण्याच्या पातळीत वाढ होईल तसेच वन्यजिवांना व पर्यावरण संवर्धनाला याचा उपयोग होईल. उपविभागीय वनअधिकारी ए.बी. गर्कल यांच्या मार्गदर्शनात व वनपरीक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेत्रुत्वात तीन वनराई बंधारे बांधण्यात आले.
यावेळी वनपाल आर.सी. पेदापल्लीवार एन.एल. नान्हे एस.एम.कटकु वनरक्षक एस.आर.चौबे ए.आर. कारेकर बी.के. वांढरे डी.जी. बनकर वनमजूर श्यामराव खेडेकर शामराव देवालकर सीताराम सातघरे गंगाधर भेन्डाले नरेंद्र निखाडे भाऊराव लान्डे गंगाधर मोहीतकर जीवनदीप सर्पमीत्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लान्डे संदीप आदे प्रवीण दुर्बडे कैलाश नीवलकर रत्नाकर पचारे विजय पचारे तुषार खोके महेश लान्डे सचिन खेडेकर तनय लान्डे प्रदीप लान्डे परीमल बोबडे सचिन खाडे अमर पचारे आदर्श शाळेचे राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींसह मोठ्या संख्येने वनवीभागचे कर्मचारी व जीवनदीप चे कार्यकर्ता उपस्थित होते.
वनविभागा मार्फत यावेळी उपस्थिताना पिण्याचे पाणी व अल्पपोहार देण्यात आला.