सामाजिक दायित्व ही नैतिक जबाबदारी - आमदार संजय धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सामाजिक दायित्व ही नैतिक जबाबदारी - आमदार संजय धोटे

Share This
-महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ व आधारवेल संस्थेच्या वतिने गरजुंना जीवनयोगी साहित्याचे वाटप  
 खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा प्रतिनिधी :

समाजाप्रती प्रत्येकाला काही तरी देणे आहे. असे समजून व्यक्ती अथवा संस्थानी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्याचा  निर्वहान करण्याची जबाबदारी नैतिक दुष्टिकोनातुन स्वीकारने गरजेचे असून आपल्या गावातील गरजूना मदतीचा हात दिल्यास सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होणार असल्याने मत महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ व आधारवेल संस्था गडचांदूर यांच्या वतीने आयोजित शहरातील आर्थिक अडचणीत असलेल्या गरजुंना जीवनयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार संजय धोटे यांनी व्यक्त केले.       
 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार संजय धोटे प्रमुख पाहुणे राजुरा पंचायत समितीच्या सभापती कुंदा जेणेकर जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे मेघताई नलगे माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव प्रभाकर ढवस प्राध्यापक अनिल ठाकूरवार सतिश धोटे साजिद बियाबानी प्राध्यापक धर्मराज काळे अनिल देवालवार उपास्थित होते शहरातील विविध भागात वास्तवयाने असलेल्या आर्थिक अडचणीतील व निराधार गरजुंना पत्रकार संघ व आधारवेल संस्था गडचांदूर च्या वतीने जीवन योगी साहित्य साडी चोळी धान्य मिठाई व इतर साहित्य वाटप करण्यात आले यावेळी अविनाश जाधव यांनी आधारवेल संस्थेच्या कार्याची दाखल घेत त्यांना सामाजिक चळवळीत समोर येण्यासाठी गडचांदूर परिसराच्या सीमा पार कडून जिल्हात कार्य करण्यासंबधी मार्गदर्शन करीत महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांनी राबवले ल्या कार्याची माहीती दिली यावेळी आर्थिक प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या 20 गरजू महिलांना जीवन उपोयोगी साहित्य वाटप करण्यात आले.  

यावेळी आमदार संजय धोटे यांचेकडून प्रत्येक महिलेला साडी भेट देत रमजणांच्या शुभेच्छा दिल्या तर अविनाश जाधव यांनी मिठाई चे डबे वाटप करीत रमजान निम्मित तोंड गोळ केले आधारवेल संस्थेच्या अध्यक्ष अर्चना देवालवार उ,षा टोंगे, अर्चना काळे, नंदा कोंगरे, वंदना कातकडे, नंदा वांढरे, अनिता बामनकार, सविता चटप, वंदना धांडे संजीवनी चंदनखेडे ,महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एजाज अहमद, सचिव श्रीकृष्ण गोरे, जाकीर सय्यद फारुख शेख, मंगेश बोरकुटे ,संतोष कुंदोजवार, वसंता पोटे ,शनावज कुरेशी ,शाहील सोळंखे  आशिष नलगे, मनोज आत्रामयांची उवस्थित होती कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण गोरे तर आभार जाकीर सय्यद यांनी मानले.