पर्यावरण सप्ताहनिमीत्य वेकोली बल्लारपूर क्षेत्र तर्फे चित्रकला स्पर्धा : स्पर्धेत चमकले चिमुकले प्रसुन, काव्या, हर्षित. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पर्यावरण सप्ताहनिमीत्य वेकोली बल्लारपूर क्षेत्र तर्फे चित्रकला स्पर्धा : स्पर्धेत चमकले चिमुकले प्रसुन, काव्या, हर्षित.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा विशेष प्रतिनिधी -

राजुरा तालुक्यातील काळ्या सोन्याच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा टाऊनशीप या कामगार वसाहतीतील स्थानिक वेकोली बल्लारपूर क्षेत्र आणि शिवाणी महिला मंडळ द्वारा जागतिक पर्यावरण दिन सप्ताह अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

        
यात वर्ग 1 ते 5 वयोगटात प्रथम क्रमांक काव्या देविदास वांढरे, द्वितीय क्रमांक हर्षित, तृतीय क्रमांक प्रसुन प्रफुल्ल शेंडे यांनी पटकावले. इयत्ता पहिली चा प्रसून, दुसरी, चौथीतील काव्या, हर्षित या चिमुकल्यांनी उत्तम कामगिरी करून उपस्थितांची मने जिंकली. वर्ग 6 ते 12 वयोगटात प्रथम क्रमांक तेजस्वी केवट, द्वितीय क्रमांक शृती झाडे, तृतीय क्रमांक स्वानंदी यांनी पटकाविला. स्पर्धेत 30 ते 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 
            
या प्रसंगी वेकोली बल्लारपूर क्षेत्र आणि शिवाणी महिला मंडळच्या महिला पदाधिकारी, सदस्य, कामगार, पालक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मंडळाचे वतीने जागतिक पर्यावरण दिन सप्ताह निमित्ताने दिनांक 1 ते 7 जून दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.