बल्लारपूर येथिल नविन बसस्थानकाच्या निक्रुष्ठ बांधकामाची खुलली पोल : भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची राजु झोडे यांची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर येथिल नविन बसस्थानकाच्या निक्रुष्ठ बांधकामाची खुलली पोल : भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची राजु झोडे यांची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : अजय आर्मूलवार -
  
बल्लारपूर येथिल नवनिर्मीत बसस्थानकाच्या निक्रुष्ठ बांधकामामुळे पहील्याच पावसात बसस्थानकाचे हाल झाले व सिलिंग आणि पत्रे पुन्हा पडले. अवघ्या काही महीन्यातच तिन वेळा अशा घटना घडल्या असुन करोडो रुपये खर्च करुन बांधलेल्या बसस्थानकाच्या बांधकामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असुन भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी राजु झोडे यांनी केली.

    
अवघ्या महाराष्ट्रात ज्या बसस्थानकाचा सुंदर बसस्थानक म्हणुन शासनाने मोठा गाजावाजा केला त्याच बसस्थानकाला भ्रष्टाचाराने ग्रासलेले असुन वर वर देखावा करुन ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने करोडोचा गैरव्यवहार झालाचे दिसुन येत आहे. अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या आशिर्वादाने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाला अशी घरघर लागेल आणि काही महिन्यातच या बसस्थानकाचे असे हाल होतील ही निंदनीय बाब असुन यावर खरच सत्ताधार्याचे अंकुश आहे का ? असा प्रश्न जनमानसात निर्माण होत आहे.
    
बल्लारपूर बसस्थानकाच्या धर्तीवर त्याच पद्धतीचे चंद्रपूर व मुल नविन बसस्थानकाचे काम सुरु असुन या बसस्थानकातही भ्रष्टाचार होण्याची शक्यता असुन यावर आताच अंकुश लावण्याची गरज आहे. बल्लारपूर बसस्थानकाची हालत बघता याची चौकशी करुन भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी राजु झोडे यांनी केली.