वन विभागा क्षेत्रातुन दगडचोरी : सुनिल बावने विरोधात पोलीसात आबिद अली यांची मानहानी ची तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वन विभागा क्षेत्रातुन दगडचोरी : सुनिल बावने विरोधात पोलीसात आबिद अली यांची मानहानी ची तक्रार

Share This
 खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -         
                          
कोरपना वन परिक्षेत्रातील पारडी बिटातुन 2000 हजार ट्रिप दगड चोरी करुन विक्री केल्या ची तक्रार सुनील बावणे यांनी वन विभागाकडे करून जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली याच्यावर चोरीचा गंभीर आरोप केला होता.

                   
कॉग्रेस शहर अध्यक्ष स्वंय घोषीत लेटर पॅड छापून पक्षाकडून प्राधिकृत मान्यता, प्रदेश कॉग्रेस किवा जिल्हा कॉग्रेस ची मान्यता नसताना राजकीय मानहानी करण्याच्या हेतूने  दिशाभुल व बिनबुडा चे खोटया तक्रारी करुन माझा असा कोणताही व्यवसाय नसून तसेच माझ्याकडे ट्रक ,ट्रक्टर ची कोणतीही मालकी नसताना अस्या प्रकार ची खोटी तक्रार दाखल करून माझी मानहानी केली आहे - अबिद अली, जनसत्याग्रह संघटना ,कोरपना 

शासकीय यंत्रणेचा गैर वापर करुण बदनामी मानहानी वाटसअप व वर्तमान पत्रात बातमी छापून बदनामी केल्या बद्दल आबीद अली यांनी पोलीसात तक्रार दाखल करून आज गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.