ग्रामीण पत्रकार संघ राजुरा तर्फे स्व.दिलीप नलगे यांना श्रद्धांजली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामीण पत्रकार संघ राजुरा तर्फे स्व.दिलीप नलगे यांना श्रद्धांजली

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा -
  
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ राजुरा तर्फ शहरातील विश्राम गृह येथे स्व. दिलीपराव नलगे संचालक आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर यांच्या मृत आत्म्याला शांती लाभो या करिता भावपुर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले अविनाश जाधव यांनी  स्व. दिलीपराव नलगे यांच्या सोबत घालवलेले लहानपणी चे आठवण आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच माजी आमदार वामन चटप यांनी सांगितले की मृत्यू अटळ आहे. या पासून कोणीही वाचू शकत नाही .पण मात्र स्व. नलगे हे या जगातून थोडे लवकर निरोप घेतले याचा आम्हाला दुःख आहे. 
     
या भावपूर्ण श्रद्धांजली च्या कार्यक्रमात कुंदाताई जेणेकर सभापती, सुनील उरकुडे जि. प. सदस्य, रमेश नळे माजी अध्यक्ष नगर परिषद राजुरा, नगरसेवक गजानन भटारकर, प्राचार्य वरकड सर, मुख्यधापक उराडे सर, कपिल इध्ये,    ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एजाज अहेमद, सचिव श्रीकृष्ण गोरे, सय्यद जाकीर, फारुख अहेमद, मंगेश बोरकुटे, शहानवाज कुरेशी, मनोज आत्राम, वसंता पोटे, संतोष पोटे, प्रफुल शेंडे याची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण गोरे यांनी केले तर आभार सय्यद जाकीर यांनी मानले.