शिवराज्याभिषेक : 6जून आजच्या दिवशी रायगडावर अखंड वाहणारा इतिहास घडला होता : वाचा संपूर्ण सोहळा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवराज्याभिषेक : 6जून आजच्या दिवशी रायगडावर अखंड वाहणारा इतिहास घडला होता : वाचा संपूर्ण सोहळा

Share This
खबरकट्टा / संपादकीय :
          "शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा 
अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला" 

देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे.

कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते,

रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ झाले.

ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता स्वातंत्र्याचा.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होते त्यांच्या बाजूने अष्टप्रधान उभे होते. 

प्रत्येक प्रधानांच्या हातात एक एक कलश होता.राजांच्या अंगावरून सप्तगंगा घळाळत होत्या गागाभट्ट मंत्र म्हणत होते.

गंगेचयमुनेचेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी

पण यातील एकही नदी स्वराज्यात नव्हती गोदावरी तेवढी स्वराज्यात उगम पावत होती परंतू नाशिक पुढे ती देखील मोगली अमलात जात होती. राज्याभिषेक पार पडला. आता वेळ आली ती राज्यरोहणाची

अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वातंत्र्यसूर्याचा उदय घोर तीमिराला चिरून आज रायगडी संपन्न होत होता.

महाराज सिहासनाजवळ आले. प्रथम भूमीवर उजवा गुडघा टेकवून महराजांनी सिहासानाला वंदन केले आणि राजे पूर्वाभिमुक उभे झाले. अवघ्या राजसभेची उत्सुकता शिगेला पोहोचली होती दुरवर राजगड आकाशात मान घुसडून आपल्या राजाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा बघत होता.

आणि तो अमृतक्षण आला. वेदमंत्रोचार थांबले.मुहूर्ताची घटिका बुडालीव त्याचक्षणी, नृपशालिवाहन शके १५९६, आनंद नाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध १२ शुक्रवार, घटी २१ पळे ३४ वि.३८|४० सी ४२ तीण घटिका रात्र उरली,

तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिव्हासनी बैसले.निमिषार्धात संवत्सर पुरोहितांनी महाराजांवर छत्र धरले आणि सर्व लोकांना तो क्षत्रिय राजा अभिषिक्त झाल्याचे घोषित केले.

क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीराजा शिवछत्रपती या महाराजांच्या नव्या बिरुदावलीचा सर्वांनी जयघोष केला पुष्पवर्षाव झाला सह्याद्रीच्या तोफांनी प्रत्येक खेड्यामध्ये पलीकडच्या विजापुरकरांना, कुत्बुशहाला, मोगलांना कळविले
की माझा राजा छत्रपती झाला. 

सर्व वातावरण खुशीचे होते. उत्तरेतून मात्र रडण्याचा आणि अल्लाला दोष देण्याचा आवाज येत होता, तो आवाज होता औरंगजेबाचा लहानपणा सरल्यावर आयुष्यात औरंगजेब पहिल्यांदा रडला होता या अल्लाह तू भी उस सिवा का खिदमतगार हो गया असे दोष देण्याचा त्याचा कार्यक्रम दिल्लीत पार पडत होता त्याच्या दुःखाचे वर्णनासाठी एक चारोळी सार्थ ती म्हणजे

"सरीतापतीचे जल मोजवेना
मध्यानीचा भास्कर सहवेना
तैसा हा राजा शिवाजी
कोणासही जिंकवेना"

याच दिवशी याच समयी रायगडावर आणिखी एक इतिहास घडला होता, इथून मागे मराठ्यांची मुले सरदार पुत्र होती पण माझा संभाजी राजा पहिला युवराज ठरला होता.


     🙏🙏🙏जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩