वर्धा नदीत बुडलेल्या युवकाचे शव आज सापडले : सुट्टीच्या दिवशी पोहायला जाणे युवकास ठरले जीवघेणे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वर्धा नदीत बुडलेल्या युवकाचे शव आज सापडले : सुट्टीच्या दिवशी पोहायला जाणे युवकास ठरले जीवघेणे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा प्रतिनिधी -
वरोरा येथील रहिवासी ज्ञानेश्वर कवडू आत्राम (19) हा आपल्या काही मित्रासोबत तुलाना येथील वर्धा नदीवर पोहायला गेला असता नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. 


ही घटना कल रविवारी दिनांक 2 जून 2019, दुपारी दोनच्या सुमारास घडली. तेव्हापासून शोधमोहीम सुरु होती दरम्यान आज सकाळी नदीत त्याचे प्रेत तरंगताना दिसले व नंतर नदीतून त्याचे प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनात पाठविण्यात आले.

अधिक माहितीनुसार ज्ञानेश्वर कवडू आत्राम हा युवक रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या काही मित्रांसोबत तुलाना येथील वर्धा नदी कडे गेला. नदीत पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे ते सर्व मित्र नदीच्या पाण्यात शिरले परंतु नदीच्या पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने ज्ञानेश्वर हा पाण्यात बुडू लागला. ते पाहून घाबरलेले मित्रांनी ज्ञानेश्वर ला वाचवायचे प्रयत्न केले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने असफल ठरले.आणि ज्ञानेश्वर पाण्यात बुडत गेला व दिसेनासा झाला. 

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी त्वरित  घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरु केली परंतु ज्ञानेश्वर सापडला नाही. अंधार झाल्याने पोलिसांनी शोध कार्य थांबविले. 

तदनंतर मालवीय वार्डातील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.विशेष म्हणजे ज्ञानेश्वर चे वडील काही वर्षांपूर्वी मरण पावले असून त्याची आई मोलमजुरीचे काम करते ज्ञानेश्वर सुद्धा मजुरीचे काम करून उदरनिर्वाह चालविन्यास हातभार लावीत होता. एकुलता एक मुलगा पाण्यात बुडून मरण पावल्याने आई शोकमग्न झाली असून या अकस्मात घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घटनेचा अधिक तपास वरोरा पोलिस करीत आहे.