त्या सफाई कामगारची त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी : राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा ची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

त्या सफाई कामगारची त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी : राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा ची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा तेहसिल कार्यलयात सफाई पदावर कार्यरत महेश मोरे  हे गरीब शेतकरी व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येक कामा करीता पैशाची मागणी करण्यात येते तसेच महिला सोबत सलगी करून त्यांना त्रास देताना दिसून येते अशा अरेरावी व मुजोर सफाई कामगारांची  त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी हरिदास झाडे तालुका, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यानी केली आहे.
   


राजुरा तहेसिल कार्यालय येथे सफाई कर्मचारी म्हणून महेश मोरे कामास आहे. त्याला या कार्यालयात जवळपास तब्बल १०-१२ वर्ष एकाच पदावर कामावर असून त्याच्या अरेरावी स्वभावामुळे  सामान्य जनता तसेच विद्यार्थी वर्ग यांना त्रास सहन करावा लागत आहे.  

मला तुम्ही पैसे द्या, मी तुमचे काम त्वरित करून देतो अशी पैशाची मागणी तो गरीब शेतकरी व विद्यार्थि वर्गाना करत असतो. जो त्याच्या पैशाची मागणी पूर्ण करत नाही त्याचा सोबत सफाई कर्मचारी मोरे अरेरावी करून तुमचे काम कसे होणार ते मी पाहून घेणार अशी सरळ धमकी देतो. तसेच तो स्त्रियांशी सलगी करून त्यांचा जवड जाण्याचा प्रयत्न करतो असं आरोप हरिदास झाडे यांनी लावले.

अशा कामचुकार आणि अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्याला या तहेसिल कार्यालयातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी हरिदास झाडे यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केली आहे.