दहेली ग्रामपंचायतीवर भाजपा बंडखोर विलास बोबडे समर्थित परिवर्तन पॅनल व शिवसेनेचा दणदणीत विजय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दहेली ग्रामपंचायतीवर भाजपा बंडखोर विलास बोबडे समर्थित परिवर्तन पॅनल व शिवसेनेचा दणदणीत विजय

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर ग्रामीण प्रतिनिधी -

गेल्या 15वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या दहेली ग्रामपंचायतीवर भाजपा विरोधी गटाने पोटनिवडणुकीत विजय मिळवत सत्ता काबीज केली. या पोटनिवडणुकीत भाजपा विरोधी गटाने सरपंचा सहित 7पैकी 5जागा काबीज करून दणदणीत विजय मिळविला आहे.

भाजपचे बंडखोर विलास बोबडे यांनी परिवर्तन पॅनल लढवून 15वर्ष सत्ता असणाऱ्या भाजपचा दारुण पराभव केला.यावेळी परिवर्तन पॅनल व शिवसेनेच्या समर्थनाने सरपंच पदी सौ सुरेख खजांची देरकर विजयी झाल्या असून वॉर्ड नं.1 मधून श्री. अक्षय सुरेश देरकर, सौ. शोभा प्रभाकर पेटकर, वॉर्ड नं.2 मधून ज्ञानेश्वर माधव टेकाम, सौ. सुषमा सचिन उरकुडे, सौ पुष्पा ज्ञानेश्वर टेकाम विजयी झाले. तर भाजपचे 2सदस्य माजी सरपंच श्री रमेश मोहितकर व सौ अश्विनी ठाकरी हे विजयी झाले आहे.

आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  झालेल्या या निवडणुकीच्या आमदार तथा वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा धक्का समजल्या जात आहे.