बीआरएसपी चे राजू झोडे काँग्रेस च्या वाटेवर? : तयारी बल्लारपूर विधानसभेची - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बीआरएसपी चे राजू झोडे काँग्रेस च्या वाटेवर? : तयारी बल्लारपूर विधानसभेची

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

विविध आंदोलने , मोर्चे,रास्तारोको ने व रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असलेले बिआरएसपीचे माजी विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदार संघात  सुरू आहे. 

झोडे हे राज्यातील वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याचे सांगितल्या जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा विजय झाला त्यात काँग्रेस ने भाजपचे आमदार, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दांडगा जनसंपर्क व विकासकामांचा धडाका असूनही 31000मतांची आघाडी घेऊन धानोरकरांच्या विजयास मोठे बळ दिले होते. नेमकी हीच जमेची बाजू पकडून बल्लारपूर हे चंद्रपूर विधानसभेतून वेगळे होऊन बल्लारपूर-मूल-पोंभुर्णा-चंद्रपूर काही भाग हे  तालुके  मिळून तयार झालेल्या या  विधानसभा क्षेत्रात 2008च्या स्थापनेपासून सलग दोन वेळा काँग्रेस ने 2008 च्या निवडणुकीत 43718 व 2014च्या निवडणुकीत 24736मतदानाने पराभव स्वीकारला होता. 

या विधानसभा क्षेत्रात लोकसभेत काँग्रेस ला मिळालेली ही सरशी अनेक समीकरणांना जन्म देऊ शकते. यातीलच एक म्हणजे बल्लारपूर नगर परिषद निवडणूकित फक्त  1916मतांनी पराभूत होणारे राजू झोडे यांना विधानसभा लढविल्यास काटे की टक्कर देणारा ठरवू शकते त्यातल्या त्यात त्यांची जनमानसात असलेली पकड व काँग्रेस चा हाथ मिळाल्यास निकालावर निश्चितच परिणाम होऊ शकतो असे अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे असून त्यांचा प्रवेश काँग्रेस ला विधानसभा क्षेत्रात नवसंजीवनी देऊ शकतो.
  
लोकसभा निवडणुकीनंतर  काही कार्यकर्त्यांनी आपला  पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये येणे पसंद केले हे ही विशेष. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच चंद्रपूर युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी यांनी भाजपमधून वापस कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, सोबतच बीआरएसपी चे राजू झोडे यांनी घेतलेल्या काही काँग्रेस नेत्यांच्या भेटी गाठी मुळे ,कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगु लागली आहे. 

राजू झोडे हे 2007 मध्ये बिएसपीच्या नेतृत्वात बल्लारपूर नगरपरिषद मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते.त्यानंतर मोठी राजकीय उथलापूथल झाल्यानंतर त्यांनी डॉ सुरेश माने यांच्या बिआरएसपी मध्ये प्रवेश केलात्यानंतर  बल्लारपूर नगराध्यक्ष पदाची 2017 मध्ये निवडणूक लढवलीय. मात्र यात त्यांना काहीश्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता  डॉ सुरेश माने यांनी झोडे यांना पक्षाची मोठी जबाबदारी देत त्यांना बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी दिली होती.